शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी संस्थानचा घाटी रुग्णालयासाठीचा निधी प्रशासकीय मान्यतेत अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 17:48 IST

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रस्तावास अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही.

ठळक मुद्दे शिर्डी संस्थानकडून राज्याच्या विविध वैद्यकीय महाविद्यालयांना ७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

औरंगाबाद : शिर्डी संस्थानकडून राज्याच्या विविध वैद्यकीय महाविद्यालयांना ७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळून निधी हस्तांतरित झाला आहे; पण औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रस्तावास अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा होत नसल्याने प्रशासकीय मान्यता रखडल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शिर्डी संस्थानच्या १५ कोटी रुपयांच्या निधीचे हस्तांतरण रखडले आहे. 

शिर्डी संस्थानतर्फे देणगीरूपातून जमा झालेला निधी राज्याच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना दिला जातो. काही दिवसांपूर्वी शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना ७१ कोटींची आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानुसार नागपूरसाठी ३५.३, यवतमाळ १३, चंद्रपूर ७.५ आणि औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी १५ कोटींची मदत जाहीर करण्यात आली. यापूर्वी त्यांनी निधी कशासाठी खर्च करावयाचा आहे, याचे प्रस्ताव संबंधित रुग्णालयांकडून मागवले होते. 

चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ येथील प्रस्तावास राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करून हा निधी हस्तांतरित करवून घेतला आहे. औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इतिहासात प्रथमच १५ कोटी रुपयांचा निधी शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून मंजूर झाला आहे. या निधीतून रुग्णालयासाठी मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजनिंग (एमआरआय) मशीन खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे. 

या प्रस्तावास तांत्रिक मान्यता मिळाली असली तरी प्रशासकीय मान्यता अद्याप मिळालेली नाही. ही मान्यता मिळविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या निधीचे हस्तांतरण रखडले आहे. क्ष-किरण विभागप्रमुख डॉ. अनघा रोटे यांनी यासंदर्भात तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी पाठपुरावा केला; पण शासनस्तरावर स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा होत नसल्याने सध्या तरी हा निधी हस्तांतरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.   

आठ दिवसांपूर्वी पत्र दिलेआठ दिवसांपूर्वी पत्र दिलेशिर्डी संस्थानचा निधी जाहीर होण्यापूर्वी तो थेट मिळण्याची शक्यता होती, त्यामुळे प्रशासकीय मान्यतेसाठी पत्र पाठविण्यात आले नव्हते. आठ दिवसांपूर्वी प्रशासकीय मान्यतेसाठी पत्र पाठविण्यात आले आहे. आगामी आठ ते पंधरा दिवसांत एमआरआय मशीन घाटीत दाखल होईल.- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीshirdiशिर्डीState Governmentराज्य सरकारfundsनिधी