शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

पक्षीसंवर्धन लोकचळवळ व्हावी

By admin | Updated: January 15, 2016 23:56 IST

औरंगाबाद : संगणकाची कळ दाबताच व्यासपीठावरील पडद्यावर रंगीबेरंगी पक्षी अवतरले. त्यांचा किलबिलाट व विशिष्ट आवाज सभागृहात पसरला.

औरंगाबाद : संगणकाची कळ दाबताच व्यासपीठावरील पडद्यावर रंगीबेरंगी पक्षी अवतरले. त्यांचा किलबिलाट व विशिष्ट आवाज सभागृहात पसरला. पक्ष्यांच्या निनादाने, त्यांच्या प्रसन्न दर्शनाने वातावरण आनंदित झाले. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत याचे स्वागत केले, अशा अनोख्या पद्धतीने पक्षी महोत्सवाचे शुक्रवारी (दि.१५) येथे उद्घाटन झाले. पक्षीसंवर्धन ही लोकचळवळ व्हावी, असा सूर याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन अ‍ॅण्ड एज्युकेशनल अकॅडमी, कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्स यांच्या वतीने स्व. भानुदासराव चव्हाण सभागृहात आयोजित पक्षी महोत्सवाचे उद्घाटन मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागाचे उपमहासंचालक जी.टी. चव्हाण, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक राजू कसंबे, ख्यातनाम वाईल्ड लाईफ फोटोग्राफर विभास आमोणकर, पक्षीमित्र प्रा. दिलीप यार्दी, कंदी यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘रासायनिक खतांचा बेसुमार वापर, पिकांवर केली जाणारी विषारी औषधांची फवारणी, प्लास्टिकचा अनिर्बंध वापर, औद्योगिक व इतर प्रदूषण, अशा अनेक कारणांमुळे पर्यावरणाचे संतुलनच बिघडले आहे. याच्याच परिणामी पक्षी- प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. या प्रश्नांची जाणीव असणाऱ्या संवेदनशील नागरिकांनी आता पुढाकार घेऊन जनजागृती करण्याची नितांत आवश्यकता आहे,’ असे चौधरी यांनी स्पष्ट केले. पर्यावरण हे आपल्या भोवतीचे संरक्षक कवच आहे. प्रदूषण, वृक्षतोड यातून आपण पर्यावरणालाच तडा देत आहोत. पक्षी- प्राण्यांची जैविक साखळीच यामुळे तुटत आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धन ही लोकचळवळ व्हावी. पक्षी महोत्सवातून हाच हेतू साध्य होण्यास मदत होईल, असे चव्हाण यांनी सांगितले. पक्ष्यांचे निसर्गातील महत्त्व आणि त्यांच्या संरक्षण व संवर्धनाबाबत आमोणकर यांनी उपयुक्त माहिती दिली. प्रा. यार्दी यांनी प्रास्ताविक केले. शहरातच जास्त पक्षीजंगलापेक्षाही शहरातच पक्ष्यांची संख्या जास्त असल्याचा दावा कसंबे यांनी केला. चिमण्या कमी झाल्याची ओरड केली जाते; परंतु यात तथ्य नाही. कारण चिमण्यांची गणनाच कधी झालेली नसल्याने त्या कमी झाल्या, हे म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही. चिमण्यांसह शहरातील पक्ष्यांची गणना करण्याची मागणीही त्यांनी केली.