शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरचा भागीदार असल्याची बतावणी करून गंडविणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 18:35 IST

पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपीला उच्चभ्रू वसाहतीतून अटक केली. 

औरंगाबाद: बिल्डरचा भागीदार असल्याची बतावणी करून इमारतीमधील फ्लॅटची परस्पर इसारपावती करून देत ३ लाख ७१ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका जणाला पुंडलिकनगर पोलिसांनी उच्चभ्रू वसाहतीतून अटक केली. 

गोपाल माहेश्वरी (रा. बदलापुर,जि. ठाणे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी हा राज्यातील विविध शहरातील उच्चभ्रू वसाहतीत राहून तेथील नवीन बांधकाम होत असलेल्या अपार्टमेंट आणि बिल्डरची माहिती मिळवित. यानंतर तो फ्लॅट खरेदी करण्यास उत्सूक असलेल्या लोकांशी संपर्क साधून बिल्डरचा भागीदार असल्याचे सांगून फसवणुक करीत असे. 

पिसादेवी रस्त्यावरील अंबादास त्र्यंबकराव राकडे हे खाजगी नोकरी करतात. त्यांना आणि त्यांची बहिण सविता गावंडे, भावजी भगवान दसपूते यांना आरोपी गोपाल माहेश्वरीने  ब्रिजवाडी येथील रोहन रेसिडेन्सी या अपार्टमेंट बांधणाऱ्या बिल्डरचा तो भागीदार असल्याचे सांगून त्यातील फ्लॅट क्रमांक २  विक्री करीत असल्याचे कागदपत्रे त्याने तयार केले. त्याआधारे त्याने राकडे यांच्याकडून इसारपावती म्हणून ३ लाख ७१ हजार रुपये घेऊन फसवणुक केली होती. 

याप्रकरणी राकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून १८ मार्च रोजी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा नोंद झाला होता. पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, कर्मचारी रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके,बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, रवी जाधव जालिंदर मांटे, विलास डोईफोडे आणि महिला कर्मचारी नंद गरड यांनी आरोपी माहेश्वरीला अटक केली. त्याने यापूर्वीही वाळूज परिसरातील मोरे चौकात कार्यालय थाटून तेथील गरीब लोकांना फसविल्याची प्राथमिक माहिती असल्याचे सहायक निरीक्षक सोनवणे यांनी सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस