शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

वाळूने भरलेल्या हायवामागे मालकाची चारचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 23:28 IST

जालना आणि बीडमधील अवैध वाळू उपसा व वाहतूक प्रकरणाने विधिमंडळाला धडक दिलेली असतानाच औरंगाबादमध्ये वाळू माफियाचा पाठलाग करताना अप्पर तहसीलदारांच्या पथकासोबत भयावह थरार घडला.

औरंगाबाद : जालना आणि बीडमधील अवैध वाळू उपसा व वाहतूक प्रकरणाने विधिमंडळाला धडक दिलेली असतानाच औरंगाबादमध्ये वाळू माफियाचा पाठलाग करताना अप्पर तहसीलदारांच्या पथकासोबत भयावह थरार घडला.

महसूल पथकाने मोठ्या शिताफीने वाळूचोरांना ताब्यात घेऊन छावणी पोलिसांत हायवा ट्रक क्र. एमएच-२० डीई-३३३५ जमा केला. तसेच पथकाच्या वाहनाला अपघात होईल, अशा पद्धतीने चारचाकी क्र. एमएच-२० ईएफ-३३३५ चालविल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सदरील चारचाकीचा परवाना रद्द करून ती जप्त करण्याबाबतही पत्र दिले आहे.

नगरनाक्याकडून छावणीमार्गे वाळूने भरलेला हायवा ट्रक वेगाने येत होता. त्या हायवाच्या पाठीमागे मालकाची चारचाकी संरक्षणार्थ धावत होती. पाठलाग करण्यासाठी महसूलचे पथक सरसावताच हायवा मालकाने महसूल पथकाला पुढे जाऊ न देण्यासाठी चारचाकी मध्येच घुसविली. परिणामी, हायवाचालकाने धूम ठोकली. चारचाकी चालकही पळून गेला. मात्र, महसूलच्या पथकाने आयकर विभाग कार्यालयामागे त्यांना गाठले. शेवटी आयकर विभागामागे हायवा ट्रकमधील वाळू एका जागेवर टाकत असताना पथकाने पडकले. तेथेच गवांदे यांची स्वीफ्ट ही चारचाकीदेखील होती. याप्रकरणी छावणी पोलिसांत आणि आरटीओकडे तक्रार करण्यात आली आहे. हायवा ट्रक पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. हा सगळा थरार नगरनाका ते आयकर विभागापर्यंतच्या अंतरात घडला.

तहसीलदारांनी कळविलेअप्पर तहसीलदार रमेश मुंदलोड यांनी कळविले आहे, २९ जून रोजी दुपारी ३.३० वा. छावणीमधून नगररोडकडे जात असताना महसूल पथकाला वाळूने भरलेला एक हायवा ट्रक येत असल्याचे आढळून आले. त्या ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. त्या ट्रकच्या मागे पांढºया रंगाची एक स्वीफ्ट चारचाकी होती. हायवाचा पाठलाग करीत असताना स्वीफ्ट चारचाकी चालकाने महसूल पथकाचे वाहन पुढे जाऊ दिले नाही. यामध्ये अपघात होण्याचा प्रसंग आला. हायवा ट्रक पळून जाण्यासाठी स्वीफ्टचालक गवांदे हा मदत करीत होता. दोन्ही वाहनांबाबत पोलिसांत, आरटीओमध्ये तक्रार दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद