शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवड होऊन चार महिने उलटले; तलाठी झालेले युवक नियुक्तीपत्राच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 18:39 IST

राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये  निवड झालेल्या उमेदवारांना  नियुक्ती देत सेवेत सामावून घेतले असल्याची माहिती  निवड झालेल्या युवकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी महसूल सचिवांकडून मार्गदर्शन मागविलेऔरंगाबाद जिल्ह्यातील यातील ५६ पदांची भरती होती.

औरंगाबाद : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तलाठी पदाच्या १,८०० जागांसाठी जुलै २०१९ मध्ये  परीक्षा घेण्यात आली होती. यात औरंगाबाद  जिल्ह्यात ५६ पदांसाठी परीक्षा झाली. यातील गुणवत्ता यादीतील युवकांच्या कागदपत्रांची पडताळणी  ९ ते ११ डिसेंबर २०१९ दरम्यान झाली. यानंतर अंतिम निवड यादी १९ मार्च २०२० रोजी जाहीर करण्यात आली. मात्र, अद्यापही यातील  निवड झालेल्या युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत. राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये  निवड झालेल्या उमेदवारांना  नियुक्ती देत सेवेत सामावून घेतले असल्याची माहिती  निवड झालेल्या युवकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

राज्यात मागील पाच वर्षांपासून नोकरभरतीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोकरभरतीवरील बंदी हटविण्यात आली होती. यानुसार  मार्च २०१९ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांत तलाठी पदाच्या १,८०० जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील यातील ५६ पदांची भरती होती. यासाठी हजारो युवकांनी अर्ज दाखल केले होते. जिल्ह्यात २ ते २६ जुलैदरम्यान परीक्षा घेण्यात आली. यानंतर २५ जिल्ह्यांतील निवड प्रक्रिया मार्च महिन्याच्या पूर्वीच पूर्ण झाली आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात मागे आहे.  निवड झालेल्या युवकांना नियुक्ती देण्यासही टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप उमेदवारांनी केला आहे. राज्य शासनाने ४ मे २०२० रोजी शासन निर्णय काढून कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर वित्तीय उपाययोजना करण्यासाठी नवीन पदभरती करण्यावर बंदी घातली. मात्र, जिल्हा प्रशासन त्या शासन निर्णयाचा आधार घेऊन नियुक्त्या देत नाही, असा आरोपही युवकांनी केला आहे. मात्र, नाशिक जिल्हा प्रशासनाने या तलाठी भरतीमधील नियुक्त्या २३ जून रोजी दिल्या आहेत. 

पुणे जिल्हा प्रशासनानेही १ जून रोजी नियुक्ती दिल्याकडे निवड झालेल्या युवकांनी लक्ष वेधले आहे. याविषयी युवकांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही नवीन भरतीला स्थगिती दिलेली आहे. जुन्या नियुक्त्यांना बंदी नसल्याचे स्पष्ट केले. तरीही औरंगाबाद जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे युवकांनी सांगितले.

महसूल सचिवांचे मार्गदर्शन मागविलेऔरंगाबाद जिल्हा प्रशासनाने तलाठी भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी महसूल व वन विभागाचे अप्पर मुख्य सचिवांकडे १८ मे रोजी मार्गदर्शन मागविले आहे. यात ४ मे रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयाचा उल्लेख केलेला आहे. यात उमेदवारांनी नियुक्ती देण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, अशी विनंती जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. यासही महिना होत आला आहे. याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे निवड झालेले विद्यार्थी हवालदिल आहेत. 

टॅग्स :Employeeकर्मचारीAurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद