शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीला दर्शनासाठी जातांना कार अपघातात चार ठार, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 13:15 IST

अपघातात दोघे जण जखमी आहेत

ठळक मुद्देसर्व भाविक जालना तालुक्यातील शेवली येथील रहिवासी

औरंगाबाद :  शिर्डीला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची भरधाव कार झाडावर आढळून झालेल्या अपघातात चार जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी रात्री दोनच्या सुमारास औरंगाबाद नगर रस्त्यावरील गोलवाडी फाट्याजवळ घडला. चालक दत्ता वसंतराव डांगे (वय 30), अक्षय  सुधाकर शिलवंत (वय 30) आकाश प्रकाश  मोरे (वय 30) अमोल नंदकिशोर गव्हाळकर (वय 22 सर्व रा शेवली ता जि जालना) यांचा मृत्यू झाला. तर संतोष राऊत (वय 17) व किरण गिरी (वय 16) हे जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, जालना तालुक्यातील शेवली येथील पाच महाविद्यालयीन तरुणांनी शिर्डी येथे दर्शनाला जाण्यासाठी किरायाने कार केली. चालकसह सहा जण कारमध्ये शेवलीहून शुक्रवारी रात्री नऊ वाजता शिर्डीकडे निघाले. जालना जवळ एका हॉटेलात जेवण करून पुढील प्रवासाला निघाले. दरम्यान, काही जण झोपी गेले. औरंगाबाद ओलांडून गोलवाडी फाट्याजवळून जातांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडावर आदळली. त्यात चालकासह तिघांचा जागीच तर एकाचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस स्टेशनचे पोहेकॉ संजय वामने, आर. डी. वडगावकर, पी. एस. अडसूळ व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघात ग्रस्तांना घाटी रुग्णालयात दाखल केले. सकाळी चार च्या सुमारास चालक दत्ता डांगे, आकाश मोरे (वय 30) व अमोल गव्हाळकर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर अक्षय शिलवंत याचा ट्रॉमा केअर मध्ये उपचारा दरम्यान सकाळी साडे चार वाजता मृत्यू झाला. तर जखमी संतोष राऊत व किरण गिरी यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यातील संतोष किरकोळ तर किरण गंभीर जखमी आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबादJalanaजालना