शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हैद्राबाद एक्स्प्रेसच्या खाली चार म्हशींचा मृत्यू, पाच तासांपासून शिवाजीनगर रेल्वे गेट बंद

By सुमित डोळे | Updated: September 20, 2023 16:34 IST

मनपा अधिकाऱ्यांनी चार तास प्रतिसादच दिला नाही

छत्रपती संभाजीनगर  : रेल्वे येण्याच्या वेळेलाच चार म्हशी रुळावर आल्याने देवगिरी एक्सप्रेस खाली त्यांचा मृत्यू झाला. परिणामी रेल्वे बुम (रेल्वे बॅरिगेत) तुटल्याने शिवाजीनगर रेल्वे गेट पाच तासांपासून बंद आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता ही घटना घडली.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, साडेबारा वाजता काही म्हशी शिवाजीनगर परिसरातील रेल्वे रुळावर करण्यासाठी आल्या होत्या. त्याच दरम्यान चिकलठाणा कडून रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या हैदराबाद एक्सप्रेस येत होती. रेल्वे मॅन ला हा प्रकार कळताच त्याने म्हशीं ना हाकलण्याचा प्रयत्नही केला. मात्र अंतर कमी असल्याने चारही म्हशी रेल्वे खाली चिरडल्या गेल्या. यात दोन म्हशी थेट उडून रेल्वे रूमवर पडल्याने बूम मुळासकट तुटले. परिणामी शिवाजीनगर रेल्वे गेट ची वाहतूक थांबली. बराच वेळ वाहतूक खोळंबल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर वाणी मंगल कार्यालयापासून रस्ता बंद करण्यात आला. मात्र रेल्वे गेट बंद पडल्याने शहरवासीयांना दर्ग्याकडून लांबून देवलाई गाठावे लागले.मनपा अधिकाऱ्यांनी चार तास प्रतिसादच दिला नाहीरेल्वे रुळावरील मृत म्हशी बाजूला करण्यासाठी पोलिसांसहस्थानिकांनी दुपारी बारा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मनपाच्या एकाही अधिकाऱ्याने प्रतिसाद दिला नाही. मनपा कर्मचाऱ्यांनी म्हशी चे मृतदेह बाजूला केले असते तर बुम दुरुस्त करून गेट उघडले गेले असते,  अशी प्रतिक्रिया रेल्वे कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIndian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात