तेर / ढोकी : तालुक्यातील ढोराळा शिवारात एका ३५ वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे़ ही घटना मंगळवारी सकाळी समोर आली असून, याबाबत ढोकी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील ढोराळ - तेर रस्त्यावरील कोल्हेगाव शिवारात राजेंद्र गायकवाड यांच्या शेताजवळ मंगळवारी सकाळी एका ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला़ याबाबत कोल्हेगावचे पोलिस पाटील विश्वास टेकाळे यांनी ढोकी पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे़ या माहितीवरून ढोकी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक ए़ पी़ काळे हे करीत आहेत़ (वार्ताहर)
ढोराळा शिवारात आढळले इसमाचे प्रेत
By admin | Updated: November 26, 2014 01:08 IST