शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन वेरूळ लेणीत; अद्वितीय सौंदर्य पाहून हरखून गेल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 11:40 IST

औरंगाबादेत पहिले पाऊल टाकताच केला भारतीय पद्धतीने नमस्कार

औरंगाबाद :  अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि माजी फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन यांनी जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणीला आज सकाळी भेट दिली. लेणी सौंदर्य पाहून हिलरी हरखून गेल्या होत्या. त्यांच्या सोबत मोजकेच व्यक्ती होते. आज दिवसभर त्या वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर परिसरात पर्यटन करणार आहेत. 

औरंगाबादेत पोहताच केला नमस्कार काळ्या रंगाचा कोट आणि पिवळ्या रंगाचा ड्रेस...गाॅगल लावलेला...चेहऱ्यावर स्मितहास्य आणि उपस्थितांना भारतीय पद्धतीने नमस्कार करून आणि हात उंचावून अभिवादन करून बलाढ्य अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि माजी फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन यांनी मंगळवारी औरंगाबादेत पहिले पाऊल टाकले. अहमदाबादहून विशेष विमानाने दुपारी ३:३५ वाजता त्यांचे चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. अमेरिकेच्या दूतावासाची सुरक्षा यंत्रणा, स्थानिक पोलिसांचा फौजफाटा आणि १२ वाहनांच्या ताफ्यासह त्या विमानतळावरून अवघ्या १३ मिनिटांत खुलताबादच्या दिशेने रवाना झाल्या. मंगळवारी त्यांचा खुलताबाद येथील ध्यान फार्म येथे मुक्काम केला. 

दौऱ्यात कुठे भेट देणार?हिलरी क्लिंटन दोन दिवस गुजरातेमध्ये होत्या. अहमदाबादहून त्या मंगळवारी औरंगाबादला दाखल झाल्या. शहाजतपूर (ता. खुलताबाद) येथील ध्यान फार्म येथे त्यांचा मुक्काम असेल. येथे ध्यान साधनेत त्या सहभागी होतील. बुधवारी वेरुळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिराला भेट देतील.

चार्टर विमानाने औरंगाबादेतएका विशेष चार्टर विमानाने हिलरी औरंगाबादेत आल्या. गुरुवारी त्या औरंगाबादहून रवाना होणार असल्याची माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.

एक दिवसाआधीच यंत्रणा दाखल, विशेष वाहनहिलरी यांच्या आगमनापूर्वी एक दिवस आधीच अमेरिकेच्या दूतावासाचे सुरक्षा अधिकारी विमानतळावर आले. ते विमानतळावर सुरक्षेची खबरदारी घेत होते. मंगळवारी दुपारी आगमनापूर्वी अमेरिका दूतावासाचे ४ पुरुष आणि दोन महिला सुरक्षा अधिकारी प्रत्येक गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करीत होते.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAjantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटन