शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे माजी आमदार ठाकरे गटात; भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांच्या हाती शिवबंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 17:56 IST

आ. सतीश चव्हाण यांच्यासोबतच्या वादातून भाऊसाहेब चिकटगावकरांनी घेतला निर्णय

औरंगाबाद: राष्ट्रवादीत नाराज असलेले वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीची घडयाळ काढत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन हाती बांधत त्यांचा समर्थकांसह पक्षप्रवेश झाला. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत चिकटगावकर यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. 

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत वैजापूर येथील काँग्रेसच्या ठोंबरे गटाला आ. सतीश चव्हाण यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला होता. चिकटगावकर यांचा विरोध असतानाही पक्षप्रवेश झाल्याने नाराज असलेल्या चिकटगावकर यांनी वैजापूर तालुक्यात समर्थकांशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे हे शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. चिकटगावकर यांच्या प्रवेशाने आता खिंडार पडलेल्या ठाकरे गटाची मतदारसंघात ताकद वाढणार आहे.   

भाऊसाहेब चिकटगावकर आणि सतीश चव्हाण यांच्यात वादभाऊसाहेब चिकटगावकर यांनी काही दिवसांपूर्वी वैजापूर येथे पत्रकार परिषद घेत आ. सतीश चव्हाण यांच्यावरील नाराजीला वाट करून दिली होती.  ज्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार आहेत त्याठिकाणी निवडणुकीच्या पूर्वी पक्षात वेगळा गट तयार करण्याचे काम आमदार चव्हाण करतात. त्यानंतर निवडणूक लागताच त्या गटाला विरोधी पक्षात पाठवून आपल्याच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडण्याचे काम चव्हाण यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप चिकटगावकर यांनी केला होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना