शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा बॅक गैरव्यवहार प्रकरणात माजी आमदार सुभाष झांबड यांचे आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:25 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासह सर्वोच्च न्यायालयाने देखील झांबड यांना अटकपूर्व जामीन नाकारला होता.

छत्रपती संभाजीनगरअजिंठा बँक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांनी आज सकाळी पोलिस आयुक्तालयात आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. झांबड यांनी अटकपूर्व जामीन मिळवा यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासह सर्वोच्च न्यायालयाने देखील झांबड यांना अटकपूर्व जामीन नाकारला होता. परिणामी झांबड यांच्यासमोरील सुटकेचे सर्व दरवाजे बंद झाल्याने ते शुक्रवारी सकाळी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले.

माजी आमदार सुभाष झांबड अजिंठा अर्बन बॅँकेचे अध्यक्ष आहेत. बॅकेमधील ९८ कोटी ४८ लाख व २१ कोटी रूपयाच्या घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर सीटीचौक पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. पहिला गुन्हा हा ऑक्टोबर २०२३ मध्ये दाखल असून दुसरा गुन्हा हा नोव्हेंबर २०२४ मध्ये नोंदवण्यात आला होता. दरम्यान, पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून सुभाष झांबड अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करत होते. यापुर्वी जिल्हा व सत्र न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठात झांबड यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर झांबड यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. येथे देखील त्यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर झांबड स्वतःहून आज सकाळी पोलिस आयुक्तालयात हजर झाले, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

१२ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीदरम्यान, निरीक्षक संभाजी पवार, सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड, मोसिन सय्यद यांनी माजी आमदार झांबड यांना दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर केले. जवळपास २० मिनिट चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेत झांबड यांना १२ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

प्रशासकांनी केली होती तक्रारअजिंठा अर्बन को-ऑप. बँकेतील ९७ कोटी ४१ लाख रुपयांच्या घोटाळाप्रकरणी २ ऑगस्ट रोजी आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीईओ प्रदीप कुलकर्णी यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रशासकांना बँकेच्या लेखा परीक्षणात नेटवर्थ रक्कम व सीआरएआर (भारित मालमत्ता प्रमाण) मध्ये मोठा फरक, तसेच ३६ कर्जदारांना ६४ कोटी ६० लाखांचे असुरक्षित कर्ज वाटप केल्याचे आढळून आले. बेकायदा कर्ज वाटप, इतर बँकांतील ठेवीच्या खोट्या नोंदी, खोटे ताळेबंद प्रमाणपत्र आणि आरबीआयला पाठविण्यात आलेला खोटा लेखापरीक्षण अहवाल या मुद्यांवरून प्रशासकांनी तक्रार दाखल केली होती.

यांना यापूर्वी अटक सोपान गोविंदराव डमाळे (६२, रा. जवाहर कॉलनी), मुख्य व्यवस्थापक संदेश भिवसन वाघ (५०, रा. बेगमपुरा), तत्कालीन शाखा व्यवस्थापक कल्याण ज्ञानेश्वर दांगोडे (५०, शहानूरवाडी), प्रशांत भास्कर फळेगावकर (५६, रा. देवानगरी), राजू सावळाराम बाचकर (४६, रा. सदानंदनगर), पोपट बाजीराव साखरे (५३, रा. एन-२), ज्ञानेश्वर ऊर्फ शरद सारजाराम पवार (३५, रा. शिवशंकर कॉलनी), गणेश आसाराम दांगोडे (३७, रा. म्हाडा कॉलनी).

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSubhash Zambadसुभाष झांबडCrime Newsगुन्हेगारीArrestअटकfraudधोकेबाजी