शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर ईशा झा यांचा मारहाणीचा आरोप, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 16:10 IST

मागील काही वर्षांपासून हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत सावली सारख्या राहणाऱ्या ईशा यांच्या या आरोपाने माजी आमदार जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

औरंगाबाद: कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर त्यांच्यासोबत कायम दिसाणाऱ्या ईशा झा यांनी मारहाणीचा आरोप केला आहे. संशय घेऊन जाधव यांनी बेदम मारहाण केल्याचे ईशा झा यांचे म्हणणे आहे. एका व्हिडीओतून ईशा झा यांनी आपबिती कथन केली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्याचेही झा यांनी म्हटले आहे. मागील काही वर्षांपासून जाधव यांच्यासोबत सावलीसारखी सोबत असणाऱ्या झा यांच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. 

मागील काही काळापासून इशा झा या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत राहत होत्या. विविध कार्यक्रमात त्यांनी सोबत हजेरी लावली. तसेच अनेक जाहिरातींमधून देखील दोघांचे एकत्रित फोटो दिसत. दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी संशय घेऊन बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडिओ ईशा यांनी  सोशल मीडियात प्रसिद्ध केला आहे. या व्हायरल व्हिडीओत ईशा झा यांनी म्हटले आहे की, आज हर्षवर्धन जाधव यांनी मला बेदम मारहाण केली आहे. माझे केस पकडून जाधव यांनी मला मुक्का मार देत मारहाण केली आहे. त्यामुळे पोलिसात मी तक्रार दाखल केली असून, आता काय होईल याबाबत मला माहित नाही. 

संशयावरून केली मारहाण तर पुढे बोलतांना त्या म्हणाल्या आहेत की, आता मी दमले आहे, माझ्यावर नेहमी संशय केला जातो, माझे नावं प्रत्येकाशी जोडले जातात. घरात असलेल्या एका मुलाशी माझे संबध जोडण्याच प्रयत्न केला. मला वाटले होते ते बदलून जातील, मात्र तसं झालं नाही. मला खूप मारहाण केली असून, मी कन्नड सोडून जात आहे. त्यामुळे यानंतर मी कधीच कन्नडमध्ये परतणार नसल्याचं देखील या व्हिडिओमध्ये ईशा झा यांनी म्हंटले आहे. दरम्यान, मागील काही वर्षांपासून हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत सावली सारख्या राहणाऱ्या ईशा यांच्या या आरोपाने माजी आमदार जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव