शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माजी न्यायमूर्ती बी.एन.देशमुख यांचे औरंगाबादमध्ये निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 10:31 IST

शेतकरी, कष्टकरी कामगार तसेच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय 'ऐतिहासिक' ठरले होते

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती,माजी आमदार बॅ.बलभिमराव नरसिंगराव देशमुख ( बी.एन.) देशमुख काटीकर (८५वर्षे) यांचे मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी १० वाजता औरंगाबाद येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

न्यायमूर्ती बी एन देशमुख यांचे मूळगाव तुळजापूर तालुक्यातील काठी होते .त्यांचे वडील उस्मानाबाद येथे वकिली व्यवसाय करीत असत. त्यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण सोलापूर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण इंग्लंड येथे घेऊन मुबई उच्च न्यायालयात रामराव आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीस सुरवात केली. 

औरंगाबाद खंडपीठ उभारण्यात मोलाची भूमिकाऔरंगाबाद येथे  मुंबई उच्च न्यायालयाचे  खंडपीठ व्हावे अशी  त्यांची तीव्र इच्छा होती. त्यांनी तेथील वकील संघात केलेल्या भाषणात औरंगाबादला खंडपीठाची का आवश्यकता आहे हे पटवून दिले. औरंगाबाद येथे खंडपीठ सुरु झाल्याबरोबर त्यांनी औरंगाबाद येथे वकीलीला प्रारंभ केला. त्यानंतर १९८६ मध्ये त्यांची न्यायमूर्तीपदी नेमणूक झाली. शेतकरी, कष्टकरी कामगार  तसेच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय 'ऐतिहासिक' ठरले होते. १९९७ साली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून ते निवृत्त झाले .

निवृत्तीनंतर औरंगाबाद येथे स्थायी झालेनिवृत्तीनंतर त्यांनी शासनाचे कोणतेही पद स्वीकारले नाही. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात  आपल्या वकीलीस प्रारंभ केला.त्यांच्या वयाला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील वकिली व्यवसाय बंद केला आणि दिल्लीवरून ते औरंगाबादला स्थायी झाले.

विधानपरिषदेचे आमदार म्हणून कारकीर्द गाजली

विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. ते विधान परिषदेचे ६ वर्ष सदस्यही होते. त्यांनी विधान परिषदेचे सदस्य असताना शासनाला अनेक प्रश्नांवर धारेवर धरले होते. ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी राज्यसभा सदस्य अँड.नरसिंहराव देशमुख यांचे पुत्र, माजी खासदार उध्दवराव पाटील यांचे भाच्चे होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, दोन नातवंडे असा परिवार आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ