शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

इमारतीतील बीयर शॉपीला देशी दारू विक्रीचा परवाना; रहिवासी संतप्त, आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 12:43 IST

संतप्त रहिवाशांनी इमारतीमध्ये दुकान आल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून धाव

छत्रपती संभाजीनगर : बीअर शॉपीचा परवाना असलेल्या दुकानाला परस्पर देशी दारु विक्रीचा परवाना देण्यात आला. याच इमारतीत पहिले संगणक क्लासेस, नर्सिंग महाविद्यालय आहे. रहिवासी इमारतीत उत्पादन शुल्काने परस्पर हा प्रकार केल्याने नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

वाहेगुरू फ्लॅट ॲण्ड शॉप ओनर्स को-आपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सर्व रहिवासी मंगळवारी दुपारी २:०० वाजता या देशी दारुच्या दुकानाविरोधात रस्त्यावर उतरले होते. गजानन महाराज मंदिर पुंडलिकनगर रस्त्यावरील इमारतीत मीताक्षी बीअर ॲण्ड वाइन शॉपी आहे. या जागी आता देशी दारु परवाना स्थलांतर करून विक्री व सेवन सुरू करण्याचा प्रयत्न आहे. स्थलांतर परवाना देताना राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिसांनी जागेची पाहणी केली नाही. सोसायटी सदस्यांनाही कळवण्यात आले नाही. मंगळवारी रहिवासी रस्त्यावर उतरताच उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आनंद चौधरी, पुनम चव्हाण, रेणुका कांबळे यांनी धाव घेत त्यांचा आक्षेप ऐकून घेत जबाब नोंदवले.

...का आहे विरोध ?-इमारतीत शासनमान्य एक नर्सिंग महाविद्यालय, एमएससीआयटी, संगणक क्लास.-दुकानाला पार्किंग व्यवस्था नाही. मद्यपी तेथे दारु पिऊन तेथेच लघुशंका करणे, महिलांची छेड काढण्याच्या घटनांची दाट शक्यता.-दुकानापासून हाकेच्या अंतरावर स्वामी समर्थ, गजानन महाराज मंदिर, ज्ञानप्रकाश विद्यामंदिर शाळा.-या विद्यार्थ्यांना देशी दारु दुकानाचा मोठा त्रास होणार.

वरिष्ठांना अहवाल पाठवणारनागरिकांचा विरोध लक्षात घेता त्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्याचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल. मद्य विक्रीचे दुकान बंद करण्यासाठी मतदान प्रक्रिया घ्यावी लागते. त्याबाबत नागरिकांना अवगत केले आहे.- आनंद चौधरी, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग