शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संपत्तीसाठी रक्ताचे नाते विसरले, मुलगा-सुनेच्या मारहाणीत पित्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 18:06 IST

उपचारादरम्यान औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

पैठण (औरंगाबाद ) : घरगुती मालमत्तेच्या वाटणीवरून मुलगा व सुनेने कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून गंभीर जखमी केलेल्या बापाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना पैठण तालुक्यातील बीडकीनपासून जवळ असलेल्या डोंगरू नाईक तांड्यावर घडली. 

सुन व मुलाने जन्मदात्या पित्यास दि १६ रोजी जबर मारहाण केल्याने  औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय राजू भूरा चव्हाण (५०) यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना  शुक्रवारी सकाळी  राजू चव्हाण यांची प्राणज्योत मावळली. या प्रकरणी पोलिसांनी मुलगा व सुनास ताब्यात घेतले आहे. राजू भुरा चव्हाण यांचा मुलगा मांगीलाल व सून कोमल यांच्यात मालमत्तेच्या कारणावरून दि.१६ नोव्हेंबर रोजी डोगरू तांडा येथे भांडण झाले होते. या भांडणात, मांगिलाल व त्याची पत्नी कोमल या दोघांनी राजू भुरा चव्हाण यांना कुऱ्हाडीच्या दांड्याने जबर मारहाण केली होती. गंभीर जखमी राजू भुरा चव्हाण यांच्यावर बिडकीन येथे प्राथमिक उपचार करून  पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

दरम्यान, राजू भुरा चव्हाण याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मावळली.याप्रकरणी, राजू भुरा चव्हाण यांची दुसरी सून अश्विनी कैलास चव्हाण यांच्या तक्रारीवरून बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलगा मांगीलाल राजू चव्हाण व सून कोमल मागिलाल चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बिडकीन चे सपोनि संतोष माने व सहायक फौजदार जगदीश मोरे, छोटुसिंग गिरासे, बापू दंडगव्हाळ आदी करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद