शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
5
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
6
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
7
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
8
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
9
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
10
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
11
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
12
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
13
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
14
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
15
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
16
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
17
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
18
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
19
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
20
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा

परदेशी विद्यार्थ्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पसंती; तब्बल १२३ विद्यार्थ्यांचे प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 18:47 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University एकिकडे उच्चशिक्षण घेण्यासाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचा कल मुंबई किंवा पुण्याकडे वाढला आहे, तर दुसरीकडे विदेशी विद्यार्थ्यांच्या पसंतीला औरंगाबादेतील विद्यापीठ, महाविद्यालये उतरली आहेत.

ठळक मुद्देभारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची शिष्यवृत्ती मिळालेल्या विदेशी विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पसंती दिली. या नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षण घेण्यासाठी २० देशांतील विद्यार्थ्यांना भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने शिष्यवृत्ती दिली आहे.

औरंगाबाद : भारतातील अन्य शहरांपेक्षा औरंगाबादेत कमी प्रदूषण, राहण्यासाठी व अभ्यासासाठी पोषक, शांत व सुरक्षित वातावरण आणि शिक्षणाचा उत्तम दर्जा, आदी बाबींमुळे विविध देशांतील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षणासाठी पसंती दिली आहे. नवीन शैक्षणिक वर्षामध्ये तब्बल १२३ विदेशी विद्यार्थ्यांचे प्रवेश या विद्यापीठात झाले असून, अभ्यासक्रमाअभावी बहुतांशी प्रवेशोत्सुक विदेशी विद्यार्थ्यांचे प्रवेश विद्यापीठाने रद्द केले आहेत, हे विशेष! ( foreign students prefers Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) 

एकिकडे उच्चशिक्षण घेण्यासाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचा कल मुंबई किंवा पुण्याकडे वाढला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक व्यावसायिक तसेच पारंपरिक महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे विदेशी विद्यार्थ्यांच्या पसंतीला औरंगाबादेतील विद्यापीठ, महाविद्यालये उतरली आहेत. देशातील अन्य शहरांच्या तुलनेत येथे राहण्यासाठी तसेच अभ्यासासाठी शांत व सुरक्षित वातावरण आहे. विद्यापीठ, महाविद्यालयांमधील शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता उत्तम आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विदेशी विद्यार्थी औरंगाबादेतील विद्यापीठ व महाविद्यालयांना पसंती देत असल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे.

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची शिष्यवृत्ती मिळालेल्या विदेशी विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पसंती दिली. त्यानुसार प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर विद्यापीठातील ‘फाॅरेन असिस्टन्स सेल’ने जे अभ्यासक्रम विद्यापीठ किंवा शहरातील संलग्नित महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहेत अशा १२३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले. जे अभ्यासक्रम येथे शिकविले जात नाहीत, अशा जवळपास २५-३० विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. हे विद्यार्थी पीएच.डी., पदव्युत्तर तसेच पदवी अभ्यासक्रम शिकण्यासाठी येथे येणार आहेत.

विद्यापीठात स्वतंत्र वसतिगृहविद्यापीठ परिसरात विदेशी विद्यार्थ्यांसाठी ४० खोल्यांचे स्वतंत्र वसतिगृह आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील अन्य वसतिगृहे बंद करण्यात आली असली, तरी विदेशी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात आजही ३४ मुले वास्तव्यास आहेत.

२० देशांतील विद्यार्थ्यांचे प्रवेशडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सन २०२१-२२ या नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षण घेण्यासाठी २० देशांतील विद्यार्थ्यांना भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने शिष्यवृत्ती दिली आहे. यामध्ये अफगाणिस्तान- ३८, अंगोला- १, बांगलादेश- २, पश्चिम अफ्रिका (जीबूती)- १, इथोपिया- २, घाना- १, इराक- २, जॉर्डन- २, केनिया- २, दक्षिण अफ्रिका (लिसोथो)- २, दक्षिण अफ्रिका (मलावी)- १, पूर्व अफ्रिका (मोझांबिक)- १, नेपाळ- १५, पॅलेस्टाईन- ६, श्रीलंका- १, सुदान- २, सिरीया- १, टांझानिया- २, येमेन- ४१, झिंबाब्वे- १, आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षणMarathwadaमराठवाडा