शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धनुष्यबाण, मशाल, पतंगावरून ‘सट्टा’बाजार गरम; सट्टेबाजांच्या यादीत मराठवाड्यातील कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 11:32 IST

भुमरे, जलील, खैरे तिघांच्या नावांवर बुकींकडे अनेकांनी लावला पैसा

छत्रपती संभाजीनगर : निवडणुका, क्रिकेट किंवा इतर कोणताही खेळ असो, त्याचे कनेक्शन सट्टाबाजाराशी असतेच. गुन्हेगारी जगाशी कनेक्ट असलेले हे ‘अर्थकारणा’चे विश्व राजकारणाशी फारच घनिष्ठ संबंध ठेवून आहे. लोकसभा निवडणूक निकालापूर्वी ‘सट्टा’बाजार गरम झाला आहे. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे, एमआयएमचे इम्तियाज जलील, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या नावांवर अनेकांनी बुकींकडे पैसे लावले आहेत. धनुष्यबाण, मशाल आणि पतंगावरून सट्टाबाजार ४ जूनपर्यंत आणखी गरम होईल. ब्लॅक मार्केटमधील समांतर अर्थव्यवस्था म्हणून सट्टाबाजाराकडे पाहिले जाते. सट्टा हा अंदाज बांधणारा जुगार आहे. यामध्ये नशिबाच्या आणि विश्लेषणाच्या जोरावर अनेक जण लाखो रुपये लावतात. यात रातोराहोण्याची चिन्हेत काही मालमाल, तर अनेक जण कंगाल होतात.

सुरुवातीला काय होता भाव...१३ मे रोजी मतदान झाल्यानंतर सट्टाबाजारामध्ये महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे हे फेव्हरेट होते. सटोडियांनी भुमरे विजयी होणार यासाठी १ हजार रुपये लावणाऱ्यास ६०० रुपये भाव दिला होता. त्यावेळी खा. जलील यांच्या नावावर व खैरे यांच्या नावावर सट्टा लावण्याचे प्रमाण कमी होते. जलील यांना दीडपट, तर खैरे यांना एकपट भाव होता. ज्याचा भाव कमी त्याची विजयाची हमी, असे सूत्र सट्टाबाजारात असते. फेव्हरेट हा सट्टाबाजारातील प्रचलित शब्द आहे.

फेव्हरेटच्या यादीत तिघेेही...१३ मेनंतर भुमरे यांचे नाव ‘सट्टा’बाजारात फेव्हरेट होते. आता खैरे व जलील यांचेही नाव फेव्हरेटच्या यादीत आल्याने विजयी कोण होणार याची उत्सुकता आहे. भुमरे, खैरे, जलील यांच्या नावे लावला जाणाऱ्या सट्ट्याचा भाव सारखा झाला आहे.

सध्या काय आहे ताजा भाव...मतदान केंद्रनिहाय मतांची आकडेवारी समोर आल्यानंतर मार्केटमध्ये विश्लेषणबहाद्दरांमुळे सट्टाबाजाराचे अर्थकारण बदलले आहे. सध्या भुमरे, जलील, खैरे या तिन्ही उमेदवारांना पसंती असून, प्रत्येकाच्या नावावर सट्टा लावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तिघांच्या नावांवर प्रत्येकी १ हजार रुपये गुंतवल्यास १ हजार रुपये अधिकचे मिळतील, असा रविवारचा ताजा भाव असल्याची चर्चा सुरू आहे.

मराठवाड्यातील या जागांसाठीही सट्टामराठवाड्यातील जालना आणि बीड मतदारसंघांच्या निकालावरूनही सट्टाबाजारात दणकावून पैसा लावल्याची चर्चा आहे. जालन्यातून महायुतीचे उमेदवार रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्यात जोरदार लढत होणार असल्याची चर्चा आहे. बीडमध्ये महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे आणि महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यातही सट्टाबाजारात काँटे की टक्कर आहे.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादbeed-pcबीडjalna-pcजालनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४