शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

डॉक्टरांच्या प्रश्नांबरोबर आरोग्य शिक्षणावर भर : सत्यनारायण सोमाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 19:11 IST

वैद्यकीय सेवेवर परिणाम करणारा ग्राहक संरक्षण कायदा, ‘एमसीआय’ आणि ‘एनएमसी’संदर्भात नव्या सरकारकडे लक्ष

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ही सर्वात जुनी संघटना आहे. डॉक्टरांच्या प्रश्नांबरोबर निरोगी समाजासाठी लसीकरण, आजारांविषयी जनजागृती आणि आरोग्य शिक्षणासाठी ‘आयएमए’ नेहमीच प्रयत्नशील असते. याच गोष्टींना यापुढेही प्राधान्यक्रम राहील. देशातील आगामी सरकार ग्राहक संरक्षण कायदा, ‘एमसीआय’ आणि ‘एनएमसी’ यासंदर्भात काय निर्णय घेईल आणि त्याचा वैद्यकीय सेवेवर काय परिणाम होईल, त्यादृष्टीने पुढील भूमिका ठरविण्यात येईल, असे ‘आयएमए’चे नूतन अध्यक्ष डॉ. सत्यनारायण सोमाणी म्हणाले.औरंगाबाद शाखेच्या २०१९-२०२० च्या अध्यक्षपदी डॉ. सत्यनारायण सोमाणी यांची निवड झाली. यानिमित्त डॉ. सोमाणी यांनी विविध मुद्यांवर मनमोकळेपणाने संवाद साधला. 

ग्राहक संरक्षण कायदा १९८६ मध्ये सुधारणा करून नोव्हेंबर २०१८ मध्ये सुधारित विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. या विधेयकात डिस्ट्रिक्ट फोरमला एक कोटीपर्यंत (पूर्वी दहा लाख) आणि राज्य फोरमला दहा कोटींपर्यंत दंड ठोठाविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या बिलासाठी डॉक्टरांच्या बाजूचा कोणताही विचार करण्यात आलेला नसल्याचे ‘आयएमए’ने म्हटले. 

याविषयी डॉ. सोमाणी म्हणाले की, हे सुधारित विधेयक अद्याप पास झालेले नाही. त्यामुळे हा कायदा आलेला नाही. याचबरोबर मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया (एमसीआय) बरखास्त करून नॅशनल मेडिकल कमिशन (एनएमसी) विधेयक येऊ घातले आहे. ‘एनएमसी’मध्ये डॉक्टर नको आहेत. लोकप्रतिनिधी, राजकीय व्यक्तींचा त्यात समावेश करण्यावर भर आहे. त्यामुळे नेमका काय फरक पडेल, हे सध्या सांगता येत नसले तरी निश्चित कोणत्या ना कोणत्या परिणामांना सामोरे जावे लागेल. यासंदर्भात ‘आयएमए’ची केंद्रीय समिती काम करीत आहे. या दोन्ही बाबींसंदर्भात येणारे सरकार काय करते, हे पाहावे लागेल, असे डॉ. सोमाणी म्हणाले. शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबर ‘आयएमए’देखील नेहमीच प्रयत्नशील असते. बालकांच्या लसीकरणाचे महत्त्व, स्वत:च्या आरोग्याची काळजी यासंदर्भात जनजागृती करणे हा अग्रक्रम आहे, असेही ते म्हणाले.

अवैध प्रॅक्टिस करणाऱ्यांवर कारवाई व्हावीशहरात अवैध गर्भलिंगनिदान करणारे डॉक्टर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. रुग्णसेवा देणारे डॉक्टर चुकीची प्रॅक्टिस करताना सापडतात, याविषयी डॉ. सोमाणी म्हणाले की, अशा डॉक्टरांना ‘आयएमए’ कधीही पाठीशी घालणार नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. प्रत्येक डॉक्टर हा सुशक्षित आहे. त्यामुळे डॉक्टरांनी अशा गोष्टींपासून स्वत:च दूर राहिले पाहिजे.

नेत्रदान केले, तरच अंधांना दृष्टीदेशात अंध व्यक्तींची संख्या मोठी आहे. जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान केले, तरच त्यांना दृष्टी मिळू शकते. एका व्यक्तीच्या अवयवदानाने चार लोकांना नवीन आयुष्य मिळते. रक्तदानही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे या गोष्टींवरही भर दिला जाणार आहे, असेही डॉ. सत्यनारायण सोमाणी म्हणाले.

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्यAurangabadऔरंगाबाद