शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

औरंगाबादकरांसाठी नवीन विमानसेवा, ‘फ्लायबिग’चे १५ मेपासून हैदराबादसाठी उड्डाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 17:32 IST

७२ आसनी विमानाचे सकाळच्या वेळेत ‘टेकऑफ’; हैदराबाद, तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांची सुविधा

औरंगाबाद : औरंगाबादहून फ्लायबिग एअरलाइन्सची विमानसेवा सुरू होण्यावर अखेर शिक्कामाेर्तब झाले आहे. फ्लायबिग एअरलाइन्सने १५ मेपासून हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. ही विमानसेवा सकाळच्या वेळेत राहणार असल्याने हैदराबाद, तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेत भर पडणार आहे.

मुंबईत २६ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत फ्लायबिग आणि आकासा एअरलाइन्सच्या प्रमुखांनी औरंगाबादहून विमानसेवा सुरू करण्याचे संकेत दिले होते. औरंगाबाद टुरिझम डेव्हल्पमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष व उद्योजक सुनीत कोठारी यांनी गुरुवारी फ्लायबिग एअरलाइन्सचे अध्यक्ष आणि सीईओ कॅप्टन संजय मंडाविया यांच्याशी संवाद साधला. यावेळी ७२ आसनी छोट्या विमानाद्वारे (एटीआर) हैदराबाद - औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा १५ मेपासून सुरू करण्यात येत असल्याची माहिती मंडाविया यांनी सुनीत कोठारी यांना दिली. हे विमान सकाळच्या वेळेत उड्डाण करेल. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी फ्लायबिगसाठी तात्काळ स्लाॅट, एटीसी क्लिअरन्स मंजूर केल्याचे कोठारी यांनी सांगितले. औरंगाबाद एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुपचे सदस्य अक्षय चाबुकस्वार म्हणाले, फ्लायबिग विमान कंपनीकडून औरंगाबाद स्टेशन सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली जात आहे. इंदूर विमानतळावरील फ्लायबिगचा काही स्टाफ औरंगाबादला स्थलांतर होईल.

असे राहील वेळापत्रकफ्लायबिगचे विमान हैदराबादहून सकाळी ६ वाजता उड्डाण घेईल आणि सकाळी ७.२० वाजता औरंगाबादला येईल. त्यानंतर हे विमान सकाळी ७.४० वाजता औरंगाबादहून झेप घेईल आणि सकाळी ९.१० वाजता हैदराबादला पोहोचेल.

इतर शहरांसाठी विमानसेवेचीही आशाऔरंगाबादहून हैदराबादसाठी विमानसेवा सुरु केल्यानंतर फ्लायबिगकडून इतर शहरांसाठीही विमानसेवा सुरु होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. सध्या औरंगाबादहून एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई, हैदराबादसाठी विमानसेवा सुरू आहे. हैदराबादसाठी इंडिगोपाठोपाठ आता फ्लायबिगचा पर्याय प्रवाशांना मिळणार आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादairplaneविमानtourismपर्यटन