शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

चैत्राच्या उन्हात बहरली फुलांची बाग

By admin | Updated: April 8, 2016 00:04 IST

नांदेड : सुंदर फुलांचा टवटवीतपणा मनाला मोहून टाकतो़ काही फुलांना गंध नसला तरीही त्याचे सौंदर्य मनाला भुरळ पाडते़

नांदेड : सुंदर फुलांचा टवटवीतपणा मनाला मोहून टाकतो़ काही फुलांना गंध नसला तरीही त्याचे सौंदर्य मनाला भुरळ पाडते़ अशी नानाविध जातीची फुले चैत्र व वैशाखात बहरतात़ हिरव्यागार पानातून डोकावणारे फुले स्वत:च्या वेगळेपणाची साक्ष देत असतात, याची अनुभूती नांदेडकरांना मिळत आहे़ चैत्राच्या उन्हाने होरपळणाऱ्या जिवांना एखाद्या हिरव्यागर्द झाडाचे दर्शन होणे, त्यातच हिरव्या पानांतून लालचुटूक फुलांचे डोकावणे मनाला आनंदी करते़ सृष्टीवर इतर झाडांची पानगळ होत असतानाच काही झाडे मात्र आपले अस्तित्व सांभाळून असतात़ या झाडांची पाने, फुले याच दिवसात बहराला येतात़ कुठे एखाद्या उजाड डोंगरमाथ्यावर हरवलेले एखादे रानफूल नजर वेधून घेते़ या उन्हाच्या काहिलीत हे इवलेसे फूल कसे बरे टवटवीत आहे? असा विचार मनाला पडतो़ निसर्गाची ही किमया उन्हाळ्यात अनेक फुलांच्या बाबतीत पहावयास मिळते़ जंगलातील हजारो पर्णहीन वृक्षांच्या सोबत राहून गुलमोहर आपल्या वैभवाची साक्ष देत रंगांची उधळण करतो़ सध्या संक्रातवेल, मोगरा, चाफा, एडिनीयम, सीताअशोक, कांचन, टबेबिया रोजीया, अमलताश, पळस, कदंब आदी फुलांचे झाडे फुलत असल्याचे महेश शुक्ला यांनी सांगितले़ नांदेड शहरात सध्या मुख्य रस्त्यावर अनेक झाडांची सावली सोबतीला आहे़ तसेच विविध फुलांची झाडेही बहरली आहेत़ विशेषत: गुलमोहराच्या फुलांचे आकर्षण वाटत आहे. लाल, पिवळ्या, गुलाबी रंगांची ही फुले उन्हाशी मैत्री करताना दिसत आहेत़ ग्रीनसिटी प्रकल्पातंर्गत शहर हिरवेगार होत आहे़ विविध फुलांच्या झाडांनी ते नटले आहे़ (प्रतिनिधी)बारावाबारावा या झाडाला चमकदार पिवळ्या रंगाची सुंदर फुले बहरतात़ चैत्र महिन्यामध्ये या झाडाला बहार येतो़ उष्ण व दमट वातावरणात बारावा झाडाची चांगली वाढ होते़ बारावा फुललेली झाडे शहराच्या विविध भागात आढळून येतात. तसेच नांदेड जिल्ह्यातील नांदेड-लोहा-कंधार, नांदेड-हदगाव व किनवट परिसरात ही झाडे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. सध्या उन्हाळा असल्याने ही झाडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत़