शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा नदीच्या पुरामुळे जुन्या पुलाचा भराव वाहून गेला; नागरिकांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 19:27 IST

Rain In Aurangabad: औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणा दरम्यान या पुलाशेजारील असलेला निझामकालीन पूल ठेकेदाराने तोडून पूर्णा नदीतील पाण्याचा प्रवाह दुसरीकडे वळवल्यानेहा प्रकार घडला आहे.

सिल्लोड: जळगाव औरंगाबाद रस्त्यावरील भवन येथील जुन्या पुलाचा भराव मंगळवारी पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला.यामुळे जळगाव-औरंगाबाद रस्त्याला खालून मोठे भगदाड पडले होते. नागरिकांचे लक्ष गेल्याने त्यांनी झाडाच्या फांद्या, माती, मुरूमचा भराव टाकून पाणी दुसरीकडे वळविले. तसेच त्याबाजूची वाहतूक बंद करून दुसरीकडून वळवली. यामुळे मोठा अनर्थ टळला नसता अनेक वाहनांचा अपघात होण्याची शक्यता होती.

औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणा दरम्यान या पुलाशेजारील असलेला निझामकालीन पूल ठेकेदाराने तोडून पूर्णा नदीतील पाण्याचा प्रवाह दुसरीकडे वळवल्यानेहा प्रकार घडला आहे. पूर्णा नदीच्यावरील भागात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस पडल्याने पूर्णता नदीला पूर आला या पुराचे पाणी व त्याच्या लाटा श्री इन्फ्रा प्रा. लिमिटेड कंपनीच्या ठेकेदाराने आडव्या घातलेल्या मातीच्या बांधामुळे  रुद्राणी कंपनीने बांधलेल्या पुलाच्या भवन गावाच्या बाजूने धडकत होत्या. त्यामुळे त्याठिकाणी टाकलेला मातीचा भराव वाहून जाऊन जळगाव-औरंगाबाद रस्त्याला पुलाखालून मोठे भगदाड पडले.

हिरडपुरी बंधाऱ्यातून २६७६१ क्युसेस विसर्ग; अनेक गावांचा संपर्क तुटला

घटनेची माहिती मिळताच भवन येथील सोमिनाथ कळम, रमेश काकडे , भागवत काथार, दत्ता कळम, अविनाश हिवराळे, गजानन कल्याणकर , सतीश कळम, पवन शेंडे या तरुणांनी तातडीने भगदाड पडलेल्या बाजूची वाहतूक बंद केली. तसेच झाडाच्या फांद्या आणि दगड टाकून  एकेरी वाहतूक  सुरळीत केली. नसता अनेक वाहने खाली कोसळली असती. जुन्या पुलाच्या जागी बांधकाम करणाऱ्या ठेकेदार  कंपनीच्या चुकीच्या पद्धतीमुळे मोठी दुर्घटना घटना होता होता टळली असे प्रत्यक्षदर्शी सोमिनाथ कळम यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विक्रम राजपूत , सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिका-यांनी  घटनास्थळी भेट दिली. बांध आणि चारी जेसीबीच्या सहाय्याने दुरुस्त केल्यामुळे पाण्याचा प्रवाह सरळ झाला. त्यामुळे पडलेले भगदाड माती भरून बुजविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद