शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या वाट्याला ७ मंत्रीपदे, खातीही चांगली, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 18:23 IST

मंत्र्यांकडे काम करण्यासाठी मोठी संधी असलेली खाती

ठळक मुद्देमराठवाड्याच्या वाट्याला सात मंत्रीपदे मराठवाड्याला रोहयोची फार गरज विलासरावांच्या दूरदृष्टीची गरज

- स.सो. खंडाळकर

औरंगाबाद : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मराठवाड्याच्या वाट्याला सात मंत्रीपदे आली आहेत. त्यांच्या खात्यांवर नजर टाकली, तर तशी ती फार मलईदार वगैरे नसली तरी चांगलीच आहेत. काम करण्यासाठी मोठी संधी असलेली ही खाती आहेत. 

नांदेडचे अशोकराव चव्हाण यांना काँग्रेसच्या कोट्यातून सार्वजनिक बांधकाममंत्रीपद मिळाले आहे. मुख्यमंत्रीपदाचा अनुभव असलेले व मराठवाड्याचे मोठे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सार्वजनिक बांधकाम खाते नेहमीच मलईदार मानले गेले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून मराठवाड्यातील रस्तेविकासाला अशोकराव गती दिल्याशिवाय राहणार नाहीत, अशी खात्री वाटते.

मराठवाड्याला रोहयोची फार गरज पैठणचे शिवसेनेचे आमदार हे पहिल्यांदाच मंत्री बनले, तेही कॅबिनेट! हे खाते मलईदार मुळीच म्हणता येणार नाही; पण काम करायला खूप संधी असलेले हे खाते आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात हेच खाते शिवसेनेच्या कोट्यातून बीडचे जयदत्तअण्णा क्षीरसागर यांच्याकडे होते. रोजगार हमी योजनेबद्दल महाराष्ट्र राज्याची मोठी ख्याती आहे. देशपातळीवर ही योजना राबवली गेली. मराठवाड्यासारख्या दुष्काळसदृश विभागात रोहयोचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, हे ओळखून काम मिळावे म्हणून निघणारे मोर्चे थांबवता आले तरी नूतन रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांचे ते मोठे यश मानता येईल. स्वत: भुमरे हे ग्रामीण भागाचेच प्रतिनिधित्व करीत आलेले आहेत. स्लिप बॉय म्हणून त्यांनी साखर कारखान्यात काम केलेले आहे. त्यामुळे कामाचे, मेहनतीचे महत्त्व त्यांना नक्कीच कळलेले आहे.

विलासरावांच्या दूरदृष्टीची गरजलातूरचे अमित देशमुख हे तरुण आहेत. विलासराव देशमुख यांचा मोठा वारसा त्यांना मिळालेला आहे. काँग्रेसच्या कोट्यातून ते राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री बनलेले आहेत. विलासराव देशमुखांकडे ही दूरदृष्टी आणि सौंदर्यदृष्टी होती, असे म्हणतात. याच दूरदृष्टी व सौंदर्यदृष्टीने काम करण्याची चांगली संधी अमितरावांना मिळालेली आहे. विशेषत: मराठवाड्यात व एकूणच राज्यात सांस्कृतिक चळवळीला उभारी देणारे ठोस निर्णय त्यांच्याकडून अपेक्षित आहेत.

टोपे यांच्याकडे आरोग्य राजेश टोपे हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे नाव. मंत्रीपदाचा  अनुभव असलेल्या राजेश टोपे यांना आरोग्य खाते दिले आहे. आरोग्याच्या रोज नवनव्या समस्या निर्माण होण्याचे आव्हान पेलवत टोपे हे आपल्या कामाचा ठसा उमटवतील, अशी अपेक्षा आहे. 

राज्यमंत्र्यांकडे महत्वाची खाती सिल्लोडचे अब्दुल सत्तार व उदगीरचे संजय बनसोडे हे दोघे या मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहेत. अब्दुल सत्तार राज्यमंत्रीपदावर खुश नाहीत; पण महसूल आणि ग्रामविकाससारखी महत्त्वाची खाती त्यांना मिळालेली आहेत.  संजय बनसोडे हे नवखे आहेत. पर्यावरण, पाणीपुरवठा यासारखी खाती त्यांना मिळालेली आहेत. गाजावाजा झालेल्या  वॉटरग्रीड प्रकल्पाचा मराठवाड्याला खरोखरच काही लाभ होतो का, याबद्दल उत्सुकता आहे.

आता खऱ्या अर्थाने न्याय द्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून बीडचे धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री बनलेले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून मागील पाच वर्षे मुंडे यांनी विधान परिषदेत जी बाजू मांडली, मग ती सामाजिक अन्याय- अत्याचाराच्या विरोधातली, भ्रष्टाचाराच्या विरोधातली किंवा विकासातल्या अनुशेषासंबंधीची असो, त्याचा चांगला अनुभव घेऊन ते कामाला लागतील आणि सामाजिक न्याय खात्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास वाटतो.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारMarathwadaमराठवाडाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारAurangabadऔरंगाबाद