शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नोव्हेंबर अखेरीस येणार पाच शहर बस; शहरवासीयांची प्रतीक्षा संपणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 19:24 IST

नोव्हेंबरअखेरपर्यंत शहरात पाच बसेस दाखल होणार आहेत. डिसेंबरअखेरीस आणखी ५० बसेस प्राप्त होतील.

ठळक मुद्देडिसेंबरअखेरीस ५० बस येणारमात्र तयारीचा आहे अभाव

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेत महापालिका शहर बससेवा सुरू करणार आहे. दिवाळीत ही बससेवा सुरू व्हावी यासाठी मनपा प्रशासन, पदाधिकाऱ्यांकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. महापालिकेला बस बांधणी करून देणाऱ्या कंपनीने दिवाळीपर्यंत काम पूर्ण होणार नसल्याचे सांगितले. नोव्हेंबरअखेरपर्यंत शहरात पाच बसेस दाखल होणार आहेत. डिसेंबरअखेरीस आणखी ५० बसेस प्राप्त होतील.

महापालिका एका बसवर तब्बल ३६ ते ४० लाख रुपये खर्च करीत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बसेसही अत्यंत लक्झरी असाव्यात, अशी अपेक्षा टाटा कंपनीकडे व्यक्त करण्यात आली आहे. बसेसची बांधणी कशा पद्धतीने सुरू आहे, याची पाहणी करण्यासाठी बुधवारी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी धारवाड येथे भेट दिली. शहरात धावणाऱ्या बसेस कशा असतील याची माहिती त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना दिली.

प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना घोडेले यांनी सांगितले की, नोव्हेंबरअखेरीस शहरात पाच बसेस दाखल होणार आहेत. बसेसवर ऐतिहासिक विविध पर्यटनस्थळांचे चित्र आहे. अत्यंत लक्झरी स्वरुपाच्या या गाड्या आहेत. डिसेंबरअखेरीस आणखी ५० बसेस मनपाला मिळतील. या बसेस चालविण्यासाठी महापालिकेने एस.टी. महामंडळासोबत करार केला आहे. महामंडळ कर्मचारी, डेपो, सर्व्हिसिंग सेटर उपलब्ध करून देणार आहे.

तयारीचा अभावयेणाऱ्या दीड महिन्यात ५५ बसेस प्राप्त होतील. या बसेस कोणत्या रूटवर धावतील हे निश्चित केलेले नाही. त्यासाठी मनपाने परिवहन समितीही तयार केलेली नाही. तिकिटाचे दर निश्चित करून प्रादेशिक परिवहन विभागाची मंजुरी घेतलेली नाही. शहरात १०० पेक्षा अधिक अत्याधुनिक बसथांबे मनपाला उभे करावे लागतील. जुन्या बसस्थानकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मनपाने अद्याप तयारीसाठी लागणारी कामेच सुरू केलेली नाहीत. मागील काही दिवसांपासून निव्वळ बस खरेदीची घाई करण्यात येत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाstate transportएसटी