शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कर्करोग शस्त्रक्रीयेचा पहिला सुपरस्पेशालीटी अभ्यासक्रम औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 08:15 IST

कर्करोग रुग्णालयात हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी ३ जागांना परवानगी दिल्याची माहीती कर्करोग रुग्णालयाचे विषेश कार्यअधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. 

ठळक मुद्दे राज्यात टाटानंतर आता शासकीय कर्करोग रुग्णालयाला मान एमसीएच-सर्जिकल ऑन्कोलॉजीच्या ३ सीटस् ला मान्यता 

- योगेश पायघन 

औरंगाबाद :  शासकीय कर्करोग रुग्णालय अर्थात राज्य कर्करोग संस्थेमध्ये २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून सर्जिकल ऑन्कोलॉजी हा सुपरस्पेशालीटी कोर्स सुरु करण्यास भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने (एमसीआय) मान्यता दिली आहे. हा कोर्स राज्यात केवळ मुंबईतील टाटा मेमोरीयल हॉस्पीटल मध्ये सुरु होता. त्यानंतर कर्करोग रुग्णालयात हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी ३ जागांना परवानगी दिल्याची माहीती कर्करोग रुग्णालयाचे विषेश कार्यअधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) किरणोपचार विभागाचे विस्तारीकरण झाल्यावर निर्माण झालेले विभागीय शासकीय कर्करोग रुग्णालयाचे टाटा मेमोरीयल हॉस्पीटलसोबत सामंजस्य करार झाला. डॉ. कैलास शर्मा यांच्या मार्गदर्शनात टाटा हॉस्पीटलच्या तज्ज्ञांना घाटी शासकीय कर्करोग रुग्णालयात येवून त्यांनी येथील अध्यापकांना प्रशिक्षीत केले. ते प्रशिक्षण एमसीआयच्या पाहणीत ग्राह्य धरण्यात आले. आतापर्यंत कॅन्सरच्या मेजर, सुप्रामेजर ४९०० तर मायनर ३४०० सर्जरी करण्याचे मोठे काम या रुग्णालयातकडून पार पडले. वाढता व्याप व चांगल्या कामाची दखल घेवून राज्य शासनाने कर्करोग संस्थेचा दर्जा दिला. या कोर्समुळे घाटीतील सुपरस्पेशालीटी कोर्सची संख्या दोनवर पोहचली. यापूर्वी डीएम न्युओनेटाॅलॉजी हा सुपरस्पेशालिटी कोर्सही घाटीत सुरु झालेला आहे.

गेल्या वर्षीपासून इथे किरणोपचारातील पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम सुरु झाला. वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. सजीव मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहान यांच्या मार्गदर्शनात संचालक शैक्षणिक संचालक टाटा मेमोरीयल हॉस्पीटल मुंबई आणि बोर्ड ऑफ गव्हर्नर्स एमसीआय नवी दिल्लीचे सदस्य डॉ. कैलास शर्मा यांनी कोर्ससाठी वर्षभर पाठपुरावा करुन मान्यता मिळवून दिली. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनात विभागप्रमुख डॉ. अनघा वरुडकर, ऑन्कोसर्जन डॉ. अजय बोराळकर यांनीही या अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मेहनत घेतली. यामुळे संस्थेचे उपचारासोबत मनुष्यबळ निर्मीतीतही योगदान देता येईल. येत्या ऑगस्ट-सप्टेंबरपासून या तीन वर्षाच्या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रीया सुरु होण्याची शक्यता आहे, अशी माहीती डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.

मुंबईनंतर केवळ औरंगाबादकर्करोगावर उपचार व संशोधन यासाठी तज्ज्ञ घडवण्यासाठी एमएस सर्जरी नंतरचा सुपरस्पेशाटी कोर्स एमसीएस- सर्जीकल ऑन्कोलॉजी आतापर्यत केवळ टाटा मेमोरीय हॉस्पीटलमध्ये सुरु होता. त्याशिवाय हा कोर्स राज्यातील सर्वच शासकीय व खाजगी संस्थांपैकी केवळ औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरु करण्यासाठी एमसीआयने तीन सिट्सला मान्यता दिली. आता राज्यात केवळ दोनच ठिकाणी हा कोर्स असेल. ही संधी आणि मान ही मिळाला आहे. याचा रुग्णांसह कर्करोग क्षेत्रातील मनुष्यबळ निर्मीतीलाही फायदा होईल.- डॉ. कैलास शर्मा, संचालक, शैक्षणिक संचालक टाटा मेमोरीयल हॉस्पीटल मुंबई तथा सदस्य बोर्ड ऑफ गव्हर्नर्स एमसीआय नवी दिल्ली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलcancerकर्करोग