शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आधी दगडफेक, नंतर चाकू काढला; कुख्यात मारेकऱ्याच्या भावाचा पोलिसांवर हल्ला

By सुमित डोळे | Updated: December 27, 2023 20:14 IST

मोबाइलचे दुकान फोडून देत होता पोलिसांना चकवा

छत्रपती संभाजीनगर : मोबाइलच्या दुकानात चोरीच्या गुन्ह्यात पसार असलेला कुख्यात गुन्हेगार शेख वाहेद शेख मोहसीन (२०, रा. सईदा कॉलनी, जटवाडा) याने सोमवारी गुन्हे शाखेच्या पथकावर चाकू, दगडाने हल्ला केला. पोलिसांनी वार चुकवून त्याच्या मुसक्या आवळल्या. खून करून मांस खाण्यासाठी कुख्यात असलेला मारेकरी बबल्याचा तो लहान भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टीव्ही सेंटर परिसरात महिनाभरापूर्वी मोबाइलचे दुकान फोडून २० पेक्षा अधिक मोबाइल चोरीला गेले होते. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाहेद साथीदारासह कैद झाला होता. सोमवारी तो हर्सूल तलावाजवळ फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या सूचनेवरून सहायक निरीक्षक विनायक शेळके, अंमलदार संजय राजपूत, विलास मुठे, रामदास गव्हाणे त्याला पकडण्यासाठी दुपारी १२ वाजता रवाना झाले. शेळके, राजपूत यांनी रिक्षातून साध्या वेशात त्याचा पाठलाग सुरू केला, तर मुठे, गव्हाणे दुसऱ्या बाजूने त्याला हेरण्याच्या तयारीत होते. ओढा ओलांडताच रिक्षा वाहेदच्या जवळ गेली व त्याला संशय आला. तत्काळ धूम ठोकत तो हनुमाननगरमध्ये पळाला. पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला.

आधी दगडफेक, नंतर चाकू काढला वाहेदने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावरून पथकाच्या दिशेने विटांचा मारा केला. नंतर घरावर लपून बसला. कर्मचारी जवळच जाताच त्याने चाकू काढून त्यांच्यावर वार केले. यात कर्मचारी किरकोळ जखमी झाले. मात्र, त्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतरही तो पोलिसांना क्रूर मारेकरी भावाच्या नावाने धमकावत होता. पोलिसांनी मात्र त्याला चांगलाच पोलिसी खाक्या दाखवत बेगमपुरा ठाण्यात नेले. त्याच्यावर सरकारी कामात हस्तक्षेप करणे, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर यापूर्वी सहा गुन्हे दाखल आहेत. उपनिरीक्षक शेख हारून याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद