शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आधी घंटी वाजवा, मगच रेल्वे चालवा! मंदिराप्रमाणे रेल्वे स्टेशनवरही प्रथा

By संतोष हिरेमठ | Updated: June 30, 2023 10:47 IST

Indian Railway: पूजा करताना, मंदिरात प्रवेश करताना घंटी वाजविली जाते, हे सर्वांना माहीतच आहे. परंतु रेल्वे स्टेशनवरदेखील अगदी मंदिराप्रमाणे घंटी आहे आणि ती रोज वाजविली जाते, हे अनेकांना माहीत नसेल.

- संतोष हिरेमठछत्रपती संभाजीनगर : पूजा करताना, मंदिरात प्रवेश करताना घंटी वाजविली जाते, हे सर्वांना माहीतच आहे. परंतु रेल्वे स्टेशनवरदेखील अगदी मंदिराप्रमाणे घंटी आहे आणि ती रोज वाजविली जाते, हे अनेकांना माहीत नसेल. कर्तव्यावर जाण्यापूर्वी म्हणजेच रेल्वे चालविण्यापूर्वी प्रत्येक लोकोपायलट आणि असिस्टंट लोकोपायलट घंटी वाजवूनच रेल्वे स्टेशनवरून रवाना होतात, हे विशेष.

घंटी वाजवूनच मंदिरातच प्रवेश केला जातो. धार्मिक विधीत आणि पूजेमध्येही  घंटीचे विशेष महत्त्व आहे. आरती करताना किंवा आरतीनंतर घंटी वाजविली जाती. रेल्वे स्टेशनवरही या घंटीचे आगळेवेगळे स्थान असल्याचे पाहायला मिळत आहे. 

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर असलेली ही घंटी वाजवूनच लोकोपायलट, असिस्टंट लोकोपायलट कर्तव्यावर रवाना होतात.त्यांच्या कार्यालयात ही घंटी आहे. कर्तव्यावर जाण्यापूर्वी विविध प्रकारची नोंद करण्याबरोबर प्रत्येक रेल्वेचालक ही घंटी वाजवितो आणि त्यानंतरच इंजिनच्या कक्षाकडे रवाना होतो.

का वाजवतात?घंटी वाजविल्यामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी, नादाने प्रसन्नता निर्माण होते. मन एकाग्र होण्यास मदत होते.   नकारात्मकता दूर होते.  घंटी वाजवून रवाना होताना एकप्रकारे सतर्कता निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक लोकोपायलट, असिस्टंट लोकोपायलट घंटी वाजवूनच रवाना होतो, असे सांगण्यात आले.  प्रत्येक रेल्वे स्टेशनवर घंटीज्या रेल्वे स्टेशनवर रेल्वेचालकांची बदली होते, जेथून रेल्वे चालकांना कर्तव्य दिले जाते, अशा प्रत्येक रेल्वे स्टेशनवर अशी घंटी असते, असेही सांगण्यात आले.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे