शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

आधी घरभाडे भत्ता बंद, आता वेतनवाढ बंदची नोटीस; मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 18:03 IST

शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्याने खुलताबाद-गंगापूर तालुक्यातील शिक्षकांत एकच खळबळ

- सुनील घोडकेखुलताबाद ( छत्रपती संभाजीनगर) : खुलताबाद- गंगापूर तालुक्यातील मुख्यालयी न राहणाऱ्या तब्बल १२५३ शिक्षकांचा तीन वर्षापूर्वी घरभाडे भत्ता बंद केलेला आहे. त्यानंतरही मुख्यालयी राहत नसल्याने या शिक्षकांना तीन वर्षांसाठी एक वार्षिक वेतनवाढ बंद करण्यासाठी शिक्षणाधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावली आहे. यामुळे गंगापूर- खुलताबाद तालुक्यातील शिक्षकांत एकच खळबळ उडाली आहे.

खुलताबाद- गंगापूर मतदारसंघाचे आ. प्रशांत बंब हे गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांनी मुख्यालयी राहण्यासाठी आग्रही असून याबाबत त्यांनी दोन्ही तालुक्यातील शिक्षकांच्या बैठकीत ही वारंवार सांगितले. पंरतू याबाबत सतत दुर्लक्ष होत असल्याने आ. प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार ८ सप्टेंबर २०२२ पासून खुलताबाद- गंगापूर तालुक्यातील १२५३ मुख्यालयी न राहणा-या शिक्षकांचे घरभाडे भत्ता बंद करण्यात आला आहे. तीन वर्षांपासून या शिक्षकांचा घरभाडे भत्ता बंद असला तरी मुख्यालयी राहण्यासाठी कुणीच तयार नसल्याचे चित्र असल्याचे चित्र आहे. 

आ. प्रशांत बंब यांनी दिनांक 01.01.2025 रोजी वेरुळ सभागृह, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आलेल्या बैठकीत मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्याविरुध्द शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने खुलताबाद- गंगापूर तालुक्यातील १२५३ मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांची एक वार्षिक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरूपात तीन वर्षासाठी बंद करण्यासाठी कारणे दाखवा नोटीसा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी २९ जुलैच्या पत्रानुसार केंद्रप्रमुखामार्फत बजावण्यात आल्या आहेत. खुलताबाद- गंगापूर तालुक्यातील शिक्षकांत एकच खळबळ उडाली आहे.

अनेक शिक्षकांनी बदल्या करून घेतल्याखुलताबाद- गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी गंगापूर- खुलताबाद तालुका सोडून इतर तालुक्यात बदलीला प्राधान्य दिले आहे. तर इतर तालुक्यातून येणारे शिक्षक खुलताबाद- गंगापूर सोडून इतरत्र बदलीला महत्व देत आहे. कारण खुलताबाद- गंगापूर तालुक्यात मुख्यालयाचा मुद्दा त्रासदायक असल्याची चर्चा शिक्षक वर्गात आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPrashant Bambप्रशांत बंबEducation Sectorशिक्षण क्षेत्र