शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पहिले ‘डीईआयसी’ केंद्र आजही कागदावरच; आता नारळीबागेत उभारणीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 15:39 IST

डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर (जिल्हा त्वरित हस्तक्षेप केंद्र किंवा डीईआयसी) घाटीत राज्यातून सर्वप्रथम प्रस्तावित होते.  

ठळक मुद्देकेंद्राच्या उभारणीसाठी १ कोटीचा प्रस्ताव२ वर्षांपूर्वी घाटीत प्रस्तावित 

औरंंगाबाद : गेल्या दोन वर्षांपासून घाटीत प्रस्तावित डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून नारळीबाग येथे उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या नारळीबाग येथील जागेवर डीईआयसी केंद्राच्या उभारणीसाठी १ कोटीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची मासिक सभा बुधवारी आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन घेण्यात आली. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रास पीपीई कीट, मास्क, हँडग्लोज, हँड सॉनिटाझर मशीन आदी साहित्यांसाठी डीपीसीमधील १२ लाखांचा वित्तीय निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा औषधी भांडार जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे स्थलांतरित करण्यात येणार असून, याच्या उभारणीसाठी १ कोटी ५० हजारांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे गलांडे यांनी सांगितले.जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्या दालनात झालेल्या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा परिषद सदस्य रामदास परोडकर, सदस्या मनीषा सोलाट, स्वाती निरफळ, सरला बनकर, कृष्णा बोरसे, भागीनाथ थोरात, डॉ. विजयकुमार वाघ, सिद्धार्थ निकाळजे, अनिल कामटे, जयश्री कुलकर्णी, रत्ना गोंडाणे, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील पहिले केंद्र आजही कागदावरचडिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर (जिल्हा त्वरित हस्तक्षेप केंद्र किंवा डीईआयसी) घाटीत राज्यातून सर्वप्रथम प्रस्तावित होते. नवजात शिशूंपैकी १० टक्के बालकांना कमतरता, वाढ आणि विकास यासंदर्भातील आजार असतात. दृष्टिदोष, नेत्रदोषांचे तीन महिन्यांत निदान करून उपचार केल्यास ते प्रभावी ठरतात. ४० आठवड्यांपूर्वी जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये अनेकदा काही दोष आढळून येतात. तीन वर्षांपर्यंत या बाळांचे दोष, कमतरता, आजार आणि वाढीसंदर्भात लक्ष ठेवण्याचे काम या डीईआयसी केंद्रातून केले जाते. या केंद्रात सेवा देण्यासाठी १६ जणांचा स्टाफही केंद्राच्या वतीने मिळतो. याशिवाय यंत्रसामग्रीही दिली जाते. जालना येथे हे केंद्र सुरू झाले. मात्र, औरंगाबाद जिल्ह्याचे केंद्र दोन वर्षांपासून फक्त कागदोपत्रीच आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधीdoctorडॉक्टर