शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

आधी गळा आवळून केले बेशुद्ध, नंतर कटरने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:48 PM

शिक्षण संस्थाचालक विश्वास सुरडकर यांची हत्या केल्याची कबुली अजय ऊर्फ अज्जू तडवी याने दिली आहे. हत्येचा प्लॅन २८ मार्च रोजी ठरल्यानंतर २९ मार्चला नॅशनल कॉलनी भागातील एका दुकानातून २५ रुपयांचे कटर खरेदी केले होते. दोरीने गळा आवळून बेशुद्ध केल्यानंतर याच कटरने अजयने ३० मार्च रोजी रात्री सव्वादहा वाजता विश्वासचा गळा चिरला.

ठळक मुद्देविश्वास सुरडकर खून प्रकरण : दुकानदाराचा नोंदविला जबाब

औरंगाबाद : शिक्षण संस्थाचालक विश्वास सुरडकर यांची हत्या केल्याची कबुली अजय ऊर्फ अज्जू तडवी याने दिली आहे. हत्येचा प्लॅन २८ मार्च रोजी ठरल्यानंतर २९ मार्चला नॅशनल कॉलनी भागातील एका दुकानातून २५ रुपयांचे कटर खरेदी केले होते. दोरीने गळा आवळून बेशुद्ध केल्यानंतर याच कटरने अजयने ३० मार्च रोजी रात्री सव्वादहा वाजता विश्वासचा गळा चिरला. आपल्या दुकानातून अजयनेच हे कटर नेल्याचा जबाब दुकानदाराने दिला आहे.विश्वास सुरडकर यांची गळा आवळून आणि चिरून हत्या केल्याची घटना ३१ मार्च रोजी सकाळी हिमायतबाग परिसरात उघडकीस आली होती. पोलिसांनी १४ दिवस कसून तपास केल्यानंतर या प्रकरणात अजय ऊर्फ अज्जू बिस्मिला तडवी याला अटक केली. अजयने सांगितल्यानंतर उपनिरीक्षक संजय बहुरे यांनी फाजलपुरा भागातील नाल्यातून हत्येसाठी वापरलेले कटर जप्त केले आहे, तर त्याच्या घरातून रक्ताने माखलेले बुट, अंगातील शर्ट, रक्ताने भरलेली पॅन्टही जप्त करण्यात आली.दुकानदाराने कटर ओळखलेआरोपी अजयच्या म्हणण्यानुसार विश्वासने स्वत:च त्याचा खून करण्याची सुपारी अजयला दिली होती. त्या दोघांनी हत्या करण्याचा डाव २८ मार्च रोजी रचला होता. त्यानंतर अजयने २९ मार्च रोजी नॅशनल कॉलनी भागातील सय्यद काझीम बिलग्रामी यांच्या दुकानातून २५ रुपयांत कटर खरेदी केले. रेडिअम कट करण्यासाठी कटर हवे, असे अजयने काझीम यांना सांगितले होते. दुकानातून विक्री झालेले आणि नाल्यातून जप्त केलेले कटर एकच असल्याचा जबाब काझीम यांनी पोलिसांना दिला. दरम्यान अजयच्या पोलीस कोठडीत वाढ झालेली असून, ती २२ एप्रिलपर्यंत राहणार आहे.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी