शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

किरकोळ वादातून जीम ट्रेनरवर गावठी कट्ट्यातून गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:17 AM

किरकोळ कारणावरून रात्री झालेल्या हाणामारीतून जीम ट्रेनरला मारहाण करण्यासाठी आलेल्या तीनपैकी एका जणाने गावठी पिस्टलमधून गोळी झाडल्याचा प्रकार बुधवारी सकाळी शिवाजीनगर येथे घडला. झाडलेली गोळी थेट न जाता वर उडून पडल्याने सुदैवाने तरुणाचे प्राण वाचले. या घटनेनंतर आरोपी पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

ठळक मुद्देसुदैवाने वाचले प्राण: पिस्टल लॉक झाल्याने गोळी उडाली वर,रात्री झालेल्या हाणामारीचा बदला घेण्यासाठी आले होते आरोपी

औरंगाबाद : किरकोळ कारणावरून रात्री झालेल्या हाणामारीतून जीम ट्रेनरला मारहाण करण्यासाठी आलेल्या तीनपैकी एका जणाने गावठी पिस्टलमधून गोळी झाडल्याचा प्रकार बुधवारी सकाळी शिवाजीनगर येथे घडला. झाडलेली गोळी थेट न जाता वर उडून पडल्याने सुदैवाने तरुणाचे प्राण वाचले. या घटनेनंतर आरोपी पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.शेख अलीम शेख नवाब (२६, रा. गारखेडा) असे गोळीबारातून वाचलेल्या जीम ट्रेनरचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, शेख अलीमचा नातेवाईक अनिस खान (२२,रा. देवळाई) हा मंगळवारी रात्री साडेअकरा ते पावणेबारा वाजेच्या सुमारास गारखेड्यातून देवळाईकडे मोटारसायकलने जात होता. शिवाजीनगर येथील एका वाईन शॉपजवळ त्याला ओळखीचा तरुण उभा दिसला. अनिस त्याच्याजवळ थांबला आणि तू एवढ्या रात्री येथे काय करतो, अशी विचारणा केली. यावेळी तेथे असलेल्या अन्य तीन तरुणांनी अचानक अनिसला शिवीगाळ करून भांडणास सुरुवात केली. ही बाब अनिसने अलीमला फोन करून कळविली. यामुळे अलीम हा अन्य दोन साथीदारांना घेऊन शिवाजीनगर येथे गेला आणि त्यांनी भांडण सोडविले. दरम्यान, बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे अलीम हा शिवाजीनगर येथील त्याच्या नयन फिटनेस सेंटर या व्यायामशाळेत गेला होता. रात्री मारहाण करणारे सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास अचानक जीममध्ये आले आणि त्यांनी अलीमला जीमबाहेर बोलावले. तेथे त्यांच्यापैकी एकाने कमरेचे गावठी पिस्टल काढून अलीमच्या पोटाला लावले. तुला खतम करतो,असे म्हणून पिस्टलमधून गोळी झाडली. मात्र, पिस्टल लॉक झाल्याने गोळी थेट अलीमच्या पोटात न जाता ती पिस्टलमधून वर उडून खाली पडल्याने तो बालंबाल बचावला. या घटनेची माहिती अलीमने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून कळविली. पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.चौकटआरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदअलीम यांच्यावर गोळीबार केल्यानंतर एक जण पळून गेला. त्याच्यासोबत असलेल्या दोन जणांना समजूत काढण्यासाठी अलीम यांनी खेडकर हॉस्पिटलच्या आवारात नेले. तेथे मला तुमच्यासोबत भांडण करायचे नाही. रात्रीचा वाद मिटविण्यासाठी आलो होतो, असे अलीमला सांगत असताना दोन संशयित आरोपी हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले. गोळीबार करणारा मात्र कॅमेºयात आला नाही. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.

गोळीबार करणाºया त्रिकुटांपैकी दोन जणांना चार तासांत बेड्या जीम ट्रेनरवर गोळ्या झाडल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी झटपट कारवाई करीत तीन आरोपींपैकी दोन जणांना अवघ्या चार ते पाच तासांत बायपासवरील बाळापूर फाटा शिवारात पकडले. आरोपींकडून गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूसही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.शहादेव महादेव सोनवणे (वय २९), जितेंद्र वसंत राऊत (वय २२) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींचा तिसरा साथीदार सलीम हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस आयुक्त म्हणाले, गोळीबाराबाबत माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, कर्मचारी मच्छिंद्र शेळके, रमेश सांगळे, बाळाराम चौरे, विलास डोईफोडे, शिवाजी गायकवाड, रवी जाधव, राजेश यदमळ, जालिंदर मांटे यांनी आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी बायपासवरील बाळापूर फाटा परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. पथकाने लगेच तेथे जाऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींनी घरात लपूवन ठेवलेले पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले.चौकटशिर्डीमधून आणले होते पिस्तूलआरोपी शहादेव हा वाहनचालक असून, त्याने सहा महिन्यांपूर्वी शिर्डी येथून एका जणाकडून हे पिस्तूल आणि जिवंत काडतूस विकत आणले होते. हे पिस्तूल विकत घेण्याचा त्याचा हेतू काय होता, हे मात्र समजू शकले नाही. शहादेवविरुद्ध हाणामारीचा यापूर्वी एक गुन्हा नोंद आहे.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी