शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज येथे प्लॉस्टिक कंपनीस भीषण आग; होरपळून वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 15:38 IST

वाळूज एमआयडीसीतील विजय प्लॉस्टिक या कंपनीला आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात कंपनीच्या परिसरात वास्तव्यास असणार्‍या एका ६५ वर्षीय वृद्धाचा होरपळून मृत्यु झाला असून जवळपास २५ ते ३० लाखाचे नुकसान झाले.

वाळूज महानगर ( औरंगाबाद ) : वाळूज एमआयडीसीतील विजय प्लॉस्टिक या कंपनीला आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात कंपनीच्या परिसरात वास्तव्यास असणार्‍या एका ६५ वर्षीय वृद्धाचा होरपळून मृत्यु झाला असून जवळपास २५ ते ३० लाखाचे नुकसान झाले.

या विषयी अधिक माहिती अशी की, वाळूज एमआयडीसीत प्लॉट क्रमांक डी.११ मध्ये प्रकाश विजयवर्गीय यांची विजय प्लॉस्टिक इंडस्ट्रिज या नावाची कंपनी आहे. या कंपनीत आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास आग लागल्याचे कंपनीत वास्तव्यास असणार्‍या रुपाली  गावंडे यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी आरडा-ओरडा केला असता साखरझोपेत असलेले इतर कामगार झोपेतून जागे झाले. आग जास्तच भडकल्यामुळे त्यांनी आगीची माहिती अग्नीशामक विभाग व एमआयडीसी वाळूज पोलिसांना देऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, कंपनीतील प्लॉस्टिकच्या मटेरियलमुळे आगीने बघता-बघता रौद्ररुप धारण केले. दरम्यान, आग आटोक्यात येत नसल्यामुळे पोलिसांनी वाळूज अग्नीशामक दलाचे दोन बंब, मनपा व बजाज आॅटो कंपनीच्या अग्नीशामक बंब व दोन टँकरला घटनास्थळी पाचारण केले. 

शेजारील कारखानाही भक्ष्यस्थानी आग इतरत्र पसरुन लगतच्या दिलीप खेडकर यांच्या पीटीके आॅटो प्रेस (प्लॉट क्रमांक डी.१०) या कंपनीला आगीचा विळखा पडला. दोन्ही कंपनीतील मशनरी व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास २५ ते ३० लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

होरपळून वृद्धाचा मृत्युविजय प्लॉस्टिक या कंपनीत काम करणारे पाच कामगारांची कुटुंबे कंपनीलगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्यास आहेत. कंपनीतील कार्यालयात फकीरा ठाकरे या कामगाराचे वडील श्रीराम ठाकरे (६५) हे झोपले होते. आग लागल्यानंतर कंपनीला आगीचा विळखा पडल्यामुळे इतर कामगारांनी आरडा-ओरडा करुन ठाकरे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या पर्यंत वेळीच पोहचता न आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

टॅग्स :fireआगAurangabadऔरंगाबादvalujवाळूज