शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
2
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
3
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
5
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
6
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
7
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
8
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
9
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
10
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
11
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
12
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
13
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
14
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
15
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
16
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
17
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
18
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
19
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
20
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!

वाळूज एमआयडीसीतील वाहनांचे स्पेअर पार्टस् बनविणारी कंपनी आगीत भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 07:55 IST

कंपनीत दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी लागणारे  प्लास्टिक स्पेअर पार्ट्सचे उत्पादन करण्यात येते.

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील ध्रुवतारा बायाटेक प्रा. लि. या कंपनीला बुधवारी (दि.३ ) पहाटे ३ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. कंपनीची संपूर्ण तीन मजली इमारत आगीच्या घेऱ्यात येऊन जवळपास ५ कोटींचे नुकसान झाले आहे. आगीत तयार स्पेअर पार्टस व रॉ-मटेरियल्स जवळून भस्मसात झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून  नाईटशिफ्टमधील सर्व २५ कामगार सुरक्षित आहेत.चार

अशोक बलभीम थोरात (रा. श्रेयनगर, औरंगाबाद) यांच्या दर्शन ग्रुपची वाळूज एमआयडीसीतील (प्लॉट क्रमांक डब्ल्यु ९७) येथे ध्रुवतारा बायोटेक प्रा. लि. या नावाची कंपनी आहे. या कंपनीत दुचाकी व तीनचाकी वाहनासाठी लागणारे विविध प्रकारच्या प्लॉस्टिक साहित्याचे उत्पादन करुन नामांकित कंपन्याला पुरविण्यात येते. बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास या कंपनीत अचानक आग लागली. नाईटशिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी वाळूज अग्नीशमन व एमआयडीसी वाळूज पोलिसांना माहिती देऊन आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र कंपनीतील प्लॉस्टिकचे तयार पार्टस व रॉ-मटेरियलने यांनी लागलीच पेट घेतल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. कंपनीतून उठणारे धुराचे लोळ व आगीच्या ज्वालामुळे लगतच्या कंपनीतील कामगार, उद्योजक यांनीही घटनास्थळ गाठून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. प्रथमदर्शनी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज कंपनी मालक अशोक थोरात यांनी वर्तविला आहे. आगीमुळे जवळपास ५ कोटी रुपयांची हानी झाल्याचे उद्योजक थोरात यांनी सांगितले.

बंबाच्या सहाय्याने ५ तासानंतर आगीवर नियंत्रणसुरवातीला गरवारे कंपनीच्या अग्नीशमन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आग आोटक्यात येत नसल्याने यानंतर वाळूज, बजाज व मनपा अग्नीशमन दलाने एकत्रित प्रयत्न सुरु केले. यासोबतच आग विझविण्यासाठी जवळपास ३० खाजगी टँकर सुद्धा कमी आले. सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास आग विझविण्यात अग्नीशमन दलाला यश आले.

कामगारांना अश्रू अनावर नाईटशिफ्टमध्ये २५ कामगार कंपनीत कामासाठी आले होते. आग लागल्यानंतर कामगारांनी आग विझविण्यास मदत केली. मात्र, आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर ते वेळीच बाहेर पडले. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, डोळ्यादेखत कंपनी जळत आहे आणि आपण हतबल आहोत या भावनेने कामगारांना अश्रू अनावर झाले होते.

टॅग्स :fireआगAurangabadऔरंगाबादWaluj MIDCवाळूज एमआयडीसी