शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माळीवाडा कंटेनरमध्ये डेपोत आग, मोठ्या क्रेनसह तीन कंटेनर पेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 18:22 IST

आग मोठी असतानाही ती बाहेर कोणाला कळू नये म्हणून टर्मिनल मॅनेजरने प्रयत्न केले. परंतु आग वाढतच गेल्याने अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : माळीवाडा परिसरातील रेल्वेच्या कंटेंनर डेपोला आग लागली. यात तीन कंटेनरसह एक मोठी क्रेन जळाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. डेपोमधील इंधनामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, या घटनेत कोणालाही इजा झाली नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

माळीवाड्याच्या रेल्वेस्थानकाच्या कंटेनर डेपोला आग लागल्याचा कॉल बुधवारी रात्री ८:३० वाजता पदमपुरा अग्निशमन केंद्राला आला. उपअग्निशमन केंद्राधिकारी अशोक खांडेकर, संजय कुलकर्णी हे पथकासह रवाना झाले. दोन बंबांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत एक क्रेनसह तीन कंटेंनरने पेट घेऊन मोठे नुकसान झाले.

लपवाछपवी कशासाठी?आग मोठी असतानाही ती बाहेर कोणाला कळू नये म्हणून टर्मिनल मॅनेजरने प्रयत्न केले. परंतु आग वाढतच गेल्याने अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. ही आग नेमकी कशामुळे लागली, याबद्दल कंटेनर विभागाचे अधिकारी, कर्मचारी मूग गिळून आहेत. माध्यमांना सुद्धा परिसरात प्रवेश करण्यासाठी थांबवण्यात आले आहे. येथील यंत्रसामुग्री जुनाट बनली आहे. कोट्यवधी रुपयांची संपत्ती येथे असून सुद्धा जुन्या मशीन का वापरल्या जातात, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. या आगीमुळे नेमके किती रुपयांचे नुकसान झाले आहे, याचाही तपशील जाहीर केला गेला नाही. या डेपोमध्ये रेल्वेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील माल येथे येतो. या कामाचा ठेका हरयाणा येथील प्रेमचंद अँड कंपनीकडे असल्याचे समजते. अग्निशमन दलाचे सूरज राठोड, शिवसांब कल्याणकर, अमिताभ कराड, दीपक गाडेकर, विक्रांत बकले, अजिनाथ खिल्लारे आदींनी आग आटोक्यात आणली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfireआग