शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणातून बेकायदा पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 19:33 IST

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देजलसंपदा विभागाच्या पाणी परवाण्याविना पाणी उपसा

पैठण : पाणी परवाना नसताना जायकवाडी धरणातून बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्या  १६ शेतकऱ्यावर  पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जायकवाडीचे सहाय्यक अभियंता बुध्दभूषण दाभाडे यांनी आज पैठण पोलीस ठाण्यात या बाबत फिर्याद दिली आहे.या बाबत दाखल याचिकेत न्यायालयाने जायकवाडी प्रशासनास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

आज जायकवाडीचे सहाय्यक अभियंता बुध्दभुषण सुखदेव दाभाडे यांनी पैठण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, दि ५ फेब्रुवारी रोजी जायकवाडी, पोलीस व महावितरणच्या संयुक्त पथकातील रोहीत तायडे सहाय्यक अभियंता महावितरण , एस टी घुसर मोजणीदार जायकवाडी जलफुगवटा शाखा,  अभिजीत कुलकर्णी व राजू तुसांबड कालवा निरिक्षक, आय डी भागवत वरिष्ठ तंत्रज्ञ महावितरण, पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिंदे व गणेश कुलट यांनी जायकवाडी धरणाच्या उजवा कालव्याच्या मुखाशी केलेल्या कारवाईत अनधिकृतपणे जलसंपदा विभागाच्या पाणी परवाण्याविना पाणी उपसा सुरू असल्याचे दिसून आले.

हा पाणी उपसा  नामदेव किसण रायकर रा महंमदपुर. बाळु भगवान गिरजे रा . घारी. जितेंद्र नामदेव पाबळे रा . महमदपुर.  हरिभाऊ अनंतराव चेवुलवार रा . महंमदपुर. गोपाळ प्रभाकर काळे रा सोनवाडी ( खु ).  वैजनाथ एकनाथ काळे रा सोनवाडी ( खु ). अनिल रावसाहेब खेडकर रा महंमदपुर. सुनिल रावसाहेब खेडकर रा महमदपुर हे आठ शेतकरी करत होते; तर अज्ञात आठ शेतकऱ्यांचे नावे समजू न शकल्याने त्यांच्या विद्युत पंपाचे स्टार्टर जप्त करण्यात आले आहे.अनधिकृतपणे जायकवाडी धरणातून पाणी उपसा करणाऱ्या सोळा शेतकऱ्यावर   कलम  430 भादवी सह कलम 92 , ( ज ) महाराष्ट्र पाटबंधारे अधीनियम 1976 प्रमाणे  कारवाई करावी  असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून  पैठण पोलीस ठाण्यात  १६ शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शेतकऱ्यांवरील गुन्हे रद्द कराविद्युत पंपाद्वारे पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने आज शेतकऱ्यात मोठा रोष निर्माण झाला. पाणी परवाना संपलेल्या शेतकऱ्यांना जायकवाडी प्रशासनाने दंड आकारून परत पाणी परवाना द्यावा. शेतकरी पाणी चोरून विकत नाही शेतीलाच वापरतात याचे भान जायकवाडी प्रशासनाने ठेवावे. गुन्हा दाखल करण्यापेक्षा शेतकऱ्यांना पाणीपरवाना देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यावर दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यात यावे यासाठी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांची आपण भेट घेणार असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र काळे यांनी सांगितले.- रविंद्र काळे, प्रदेश सरचिटणीस कॉंग्रेस

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस