शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

मायलेकीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या अनोळखीला शोधले हातावरील गोंधणावरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:26 IST

घरी जाण्यासाठी लिफ्ट देण्याचे आमिष दाखवून मायलेकीला बायपास परिसरातील निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाºया अनोळखी आरोपीस हातावरील गोंधणावरून ओळख पटवून जवाहरनगर पोलिसांनी बुधवारी रात्री बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देजवाहरनगर पोलिसांच्या प्रयत्नाला यश : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मायलेकींसोबत अश्लील कृत्य करून आरोपी झाला होता पसार, वडिलाच्या खुनातील आरोपी

औरंगाबाद : घरी जाण्यासाठी लिफ्ट देण्याचे आमिष दाखवून मायलेकीला बायपास परिसरातील निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाºया अनोळखी आरोपीस हातावरील गोंधणावरून ओळख पटवून जवाहरनगर पोलिसांनी बुधवारी रात्री बेड्या ठोकल्या.किशोर विलास आव्हाड (२२, रा. राजनगर) असे आरोपीचे नाव आहे. जवाहरनगर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, २५ मार्च रोजी रात्री ३० वर्षीय पीडिता ७ वर्षीय मुलीला सोबत घेऊन शहानूरमियाँ दर्गा परिसरातील आठवडी बाजारात खरेदीसाठी आली होती. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी ती निघाली तेव्हा तिच्याजवळ दहा रुपयेच उरले होते. शिवाय घराकडे जाण्यासाठी तिला रिक्षा मिळत नव्हती. तिच्यावर नजर ठेवून असलेला आरोपी किशोर अचानक तिच्याजवळ आला आणि तुम्हाला कोठे जायचे आहे, असे विचारले. मी तिकडेच जात आहे, तुम्हाला सोडून देतो, असे म्हणून त्याने मायलेकीला दुचाकीवर बसविले. मायलेकीला घराकडे न नेता राजनगर परिसरातील नाल्याजवळ नेले. निर्जनस्थळी अचानक खिशातून चाकू काढून त्याने पीडितेला तिच्या चिमुकलीसमोर अंगावरील कपडे काढायला लावले. चिमुकली आरडाओरड करून रडू लागल्याने त्याने चिमुक लीला चूप बस नाही तर तुम्हाला मारून टाकीन, असे धमकावले. तेथे पीडितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने प्रतिकार करताच आरोपीने मायलेकीला धमकावत तेथून पळ काढला. घाबरलेल्या मायलेकी घरी परतल्या आणि दुसºया दिवशी सकाळी त्यांनी जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.केवळ वर्णनाच्या आधारे शोधले आरोपीलापीडितेला आरोपीचे नाव माहीत नव्हते. पीडितेच्या मुलीने मात्र आरोपीच्या उजव्या हातावर सुरेखा आणि अंगठ्याजवळ इंग्रजीत के अक्षर गोंधलेले असल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपीने डाव्या हाताच्या मनगटावर केशरी रंगाचा धागा बांधलेला, गळ्यात दहा रुपयांचे नाणी बांधलेले आणि कानात बाळी घातलेली, असे वर्णन पीडितेने पोलिसांना दिले होते. सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे, सहायक उपनिरीक्षक दत्ता बोटके, पोलीस नाईक विजय वानखेडे, पोलीस मित्र रवी हाटकर आणि सिद्धांत राणा हे आरोपींचा शोध घेत होते. खबऱ्यांनाही त्यांनी कामाला लावले होते. पोलिसांच्या तपासाला यश आले आणि बुधवारी रात्री आरोपी किशोरला बेड्या ठोकण्यात त्यांना यश आले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी