शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘क्रांती’ला पालकांनी स्वीकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 12:47 IST

जन्मानंतर अवघ्या काही दिवसांतच अनाथालयात दाखल होण्याची वेळ आलेल्या ‘क्रांती’ तिच्या पालकांनी आज सकाळी स्वीकारले.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कुप्पा येथे राहणाऱ्या छायाबाई राजू थिटे यांची शासकीय रुग्णालयात ११ मे रोजी प्रसुती झाली. त्यांना मुलगी झाली असली तरी डॉक्टर आणि परिचारिकांच्या गोंधळामुळे नोंदवहीत मुलगा झाल्याचे नोंदवले गेले.

औरंगाबाद : जन्मानंतर अवघ्या काही दिवसांतच अनाथालयात दाखल होण्याची वेळ आलेल्या ‘क्रांती’ तिच्या पालकांनी आज सकाळी स्वीकारले. औरंगाबादेतील सिडको एन ४ मधील भारतीय समाज सेवासंघाच्या अनिकेतन या अनाथालयात हस्तांतरणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यात बालकल्याण समितीचे पदाधिकारी आणि अनाथालयाच्या संचालिका यांनी  थिटे दाम्पत्याच्या समुपदेशनात महत्त्वाची भूमिका बजावली. 

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कुप्पा येथे राहणाऱ्या छायाबाई राजू थिटे यांची शासकीय रुग्णालयात ११ मे रोजी प्रसुती झाली. त्यांना मुलगी झाली असली तरी डॉक्टर आणि परिचारिकांच्या गोंधळामुळे नोंदवहीत मुलगा झाल्याचे नोंदवले गेले. दरम्यान, मुलीची प्रकृती खालावली. दहा दिवस हा घोळ सुरुच होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत 'डीएनए' चाचणी करण्याचा निर्णय घेतला. याचा अहवाल आल्यानंतर मुलीला थिटे दाम्पत्यास सोपविण्यात आले. मात्र, पुन्हा अवघ्या २२ तासांतच थिटे दाम्पत्याने विचार बदलला आणि मुलीला औरंगाबादेतील भारतीय समाज सेवा संघाच्या अनिकेतन या अनाथालयात दाखल केले.

पालकांना 'डीएनए'बद्दल माहितीच नाही

मुलीवर अनाथालयात दाखल होण्याची वेळ आल्याने अनेकांचे मन हेलावले. दरम्यान, जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अ‍ॅड. ज्योती पत्की, सदस्या अ‍ॅड. अनिता शिऊरकर, डॉ. मनोहर बन्सवाल व भारतीय समाज सेवा संघाच्या संचालिका वसुधा जातेगावकर यांनी थिटे दाम्पत्याचे समुदेशन करण्याचा निर्णय घेतला. यात अनेक बाबी उघडकीस आल्याचे जातेगावकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. 'डीएनए' अहवाल काय असतो हेच मुळात थिटे दाम्पत्यास माहीत नव्हते. 'डीएनए' अहवालही त्यांना दाखविण्यात आला नव्हता, असे त्यांच्याशी चर्चा करताना दिसून आले. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेज याचा विचार करुन या दाम्पत्याने पोटची मुलगी नाकारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु 'डीएनए' अहवालास आव्हान देता येत नाही. हा अहवालच अंतिम असतो, असे थिटे दाम्पत्यास सांगण्यात आले. तर 'डीएनए' अहवाल मिळण्यास दोन ते चार वर्षे लागतात, असे काही लोकांनी या दाम्पत्यास सांगितले होते. त्यामुळे हे दाम्पत्य गोंधळून गेले होते.

असे केले समुपदेशन

शासनाला विनंती करुन 'डीएनए' अहवाल शक्य तितक्या लवकर देण्याची विनंती करण्यात आल्याचे या दाम्पत्यास सांगितले. त्यानंतर त्यांना 'डीएनए' अहवाल काय असतो, हे सविस्तरपणे समजावून सांगितले. तेव्हा त्यांचे मनपरिवर्तन झाले. त्यानंतर भारतीय समाज सेवासंघाच्या अनिकेतन या अनाथालयात मुलगी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अ‍ॅड. ज्योती पत्की, अ‍ॅड. अनिता शिऊरकर, डॉ. मनोहर बन्सवाल, भारतीय समाज सेवासंघाच्या अनिकेतन या अनाथालयाच्या संचालिका वसुधा जातेगावकर, पर्यवेक्षिका पवार, प्रज्ञा घुले, मिनाक्षी पाटील, आरती देशमुख आदी उपस्थित होते. 

बीडच्या ‘क्रांती’ला मिळणार पुन्हा आईची माया )

टॅग्स :WomenमहिलाBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडAurangabadऔरंगाबादFamilyपरिवार