शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

अखेर महापालिकेची अतिक्रमणे, हातगाड्यांवर कारवाई सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 17:26 IST

पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, औरंगपुरा, शाहगंजमध्ये ३५ पेक्षा अधिक लहान-मोठी अतिक्रमणे हटविली

ठळक मुद्देरस्त्यावर चालणे सुसह्य करण्यासाठी पोलीस आणि महापालिकेची संयुक्त कारवाई 

औरंगाबाद : शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यास मंगळवारी महापालिकेने सुरुवात केली. सकाळी १२ वाजेपासून पैठणगेट येथून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे, हातगाड्या जप्तीचा सपाटाच महापालिकेने लावला. त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली. हातगाडीचालक सैरावैरा गल्लीबोळांमध्ये पळत होते. अवघ्या दीड तासात महापालिकेने टिळकपथ, गुलमंडी, औरंगपुरा येथे कारवाई केली. ३५ पेक्षा अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली.

अतिक्रमणांमुळे शहरात वाहनधारकांसह सर्वसामान्यांना पायी ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक पोलीस, महापालिका निव्वळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे छायांकित वृत्त ‘लोकमत’ने १६ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केले. याची दखल घेऊन पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत शनिवारी बैठक घेण्यात आली. बैठकीत अतिक्रमणे  हटविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे आश्वासन मनपातर्फे देण्यात आले होते. नियोजित कार्यक्रमानुसार मंगळवारपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मोहिमेसाठी वाहतूक पोलीस, पोलीस कर्मचारी असा मोठा बंदोबस्त देण्यात आला होता.

पैठणगेट येथून कारवाईला सुरुवात करताच पुढील हातगाडीचालक, फेरीवाले गायब झाले. रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या काही हातगाड्या मनपा पथकाच्या हाती लागल्या. या हातगाड्या जप्त करण्यात आल्या. टिळकपथवरील बहुतांश हातगाडीचालक फरार झाले होते. लोखंडी टपऱ्या, व्यापाऱ्यांनी लावलेले बोर्ड आदी साहित्य जप्त करण्यात आले. गुलमंडी येथील परिसरही चकचकीत करण्यात आला. मात्र, महापौरांच्या आदेशानंतरही या भागातील पार्किंग सुरूच आहे.महापालिका आणि पोलिसांच्या या संयुक्त मोहीमेत पुढे बाराभाई ताजिया ते अंजली चित्रपटगृह या रस्त्यावर कारवाई सुरू करण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली छोटी-छोटी अतिक्रमणे काढण्यात आली. महात्मा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत कारवाई सुरू असताना महापालिकेची सर्व वाहने साहित्याने खचाखच भरली. वाहनांमध्ये जप्त केलेले साहित्य ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती. नागेश्वरवाडी पुलापर्यंत कशीबशी मोहीम राबविण्यात आली.

सायंकाळी ४.३० नंतर शाहगंज चमन भागात कारवाईला सुरुवात करण्यात आली. महापालिकेच्या पथकाला पाहून अनेक हातगाडीचालक, फेरीवाले पसार झाले होते. मोजकेच फेरीवाले मनपा पथकाच्या हाती लागले. चमन परिसरातील चारही बाजूचे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले. या कारवाईत पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे, संजय जक्कल, शिवदास राठोड, इमारत निरीक्षक जे. ई.जाधव, एल.एल.कुलकर्णी, पी.बी. गवळी, मझहर अली, सय्यद जमशीद, आर.एस. राचतवार आदींची उपस्थिती होती.

वाहतूक सुरळीत राहावी हीच प्रामाणिक इच्छाशहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलीस यंत्रणा १२ महिने प्रयत्नशील असते. दररोज ५०० पेक्षा अधिक वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. मागील चार महिन्यांमध्ये अपघातांचे प्रमाणही कमी झाले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे, फुटपाथवरील अतिक्रमणे काढणे हे महापालिकेचे काम आहे. त्यांना कधीही कोणतीही मदत लागत असल्यास आम्ही तत्पर असतो. मंगळवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामुळे बराच फरक पडेल.- मीना मकवाना, पोलीस उपायुक्त

नियोजित कार्यक्रमानुसारच कारवाई शनिवारी महापालिका आणि पोलीस यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीत अ‍ॅक्शन प्लान तयार करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार महापालिकेने पुढील काही दिवसांसाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. नियोजित कार्यक्रमानुसार पुढेही कारवाई सुरू राहणार आहे. सकाळी कारवाई केल्यावरही सायंकाळी पथकाकडून पुन्हा पाहणी करण्यात येईल. भविष्यात पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत, यासाठी मनपा प्रयत्नशील आहे.- रवींद्र निकम, उपायुक्त, मनपा

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमणAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ