शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ठरलं..! पार्किंगसाठी 'या' ७ ठिकाणी नक्की मिळणार जागा; लवकरच संपूर्ण शहरात झोन निश्चिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 14:20 IST

पुण्यातील मेट्रोची पार्किंग सांभाळण्याचा अनुभव असलेल्या कार्बलेट पार्किंग ॲण्ड सर्व्हिसेसला काम देण्याचा निर्णय झाला.

औरंगाबाद : शहराला प्रामुख्याने मागील काही वर्षांपासून पार्किंगचा प्रश्न भेडसावत आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासन पार्किंगचे धोरण निश्चित करण्यासाठी प्रयत्न करीत होते. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, शहरात प्रयोगिक तत्वावर ७ ठिकाणी पार्किंग सुरू करण्यात येणार आहेत. नागरिकांना सवय लागावी म्हणून सुरुवातीचे दोन महिने पार्किंग मोफत राहणार आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी वाहने उभी करण्यात येतात. त्यामुळे दुचाकी, चार चाकी वाहनधारकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. महापालिकेकडून पार्किंग झोनच निश्चित करण्यात आले नव्हते, त्यामुळे वाहतूक पोलिसांना कारवाईही करता येत नव्हती. शहरात कुठेही नो पार्किंगचे बोर्ड, वन-वे बोर्ड नाहीत. महाराष्ट्र शासनाने पार्किंगचे धोरण निश्चित करण्याचे आदेश महापालिकेला दिले. मागील काही वर्षांपासून बैठकांवर बैठकाच घेण्यात येत होत्या, धोरण काही निश्चित होतच नव्हते. प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दोन वर्षांपासून पार्किंगच्या विषयावर काम सुरू केले. उपायुक्त अपर्णा थेटे आणि स्मार्ट सिटीच्या टीमला जबाबदारी सोपविली होती. अखेर दोन दिवसांपूर्वी महापालिकेचे धोरण निश्चत झाले.

पुण्याच्या संस्थेला कामपुण्यातील मेट्रोची पार्किंग सांभाळण्याचा अनुभव असलेल्या कार्बलेट पार्किंग ॲण्ड सर्व्हिसेसला काम देण्याचा निर्णय झाला. महापालिका लवकरच संबंधित संस्थेसोबत करार करणार आहे. पहिल्या टप्प्यात संस्थेची नेमणूक फक्त २४ महिन्यांसाठी करण्यात येणार आहे. काम चांगले असेल तर करार वाढवून दिला जाणार आहे.

संपूर्ण जबाबदारी संस्थेचीपार्किंग झोन, नो पार्किंग, फ्री पार्किंग झोन असे प्रकार यामध्ये असतील. ठिकठिकाणी साईन बोर्ड लावणे, वेब ॲप तयार करणे, नागरिकांकडून पैसे वसूल करणे आदी कामे खासगी संस्थेकडे असतील. प्रारंभीचे दोन महिने पार्किंग फ्री राहील. नंतर ३० टक्के रक्कम संस्थेने स्वत:कडे ठेवावी, उर्वरित ७० टक्के मनपाला द्यावी.

दुसरा टप्पाही लवकरचमहापालिका शहागंज, औरंगपुरा, पैठणगेट आदी भागांत दुसऱ्या टप्प्यात पार्किंग सुरू करणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहरातील विविध भागांत पार्किंग झोन तयार केले जाणार आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTrafficवाहतूक कोंडी