शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

...अखेर विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेत प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 13:10 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प आज अधिसभेत मांडला जाणार आहे. मात्र या सभेत प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीवरून गोंधळ उडाला.

ठळक मुद्देविद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंजूर केलेला ३२० कोटी ७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज अधिसभेत मांडला जाणार आहे.माध्यम प्रतिनिधींच्या सभेत उपस्थित राहण्यावर कुलगुरूंनी विरोध केला. यावर सदस्यांनी त्यांच्या उपस्थितीसाठी आग्रह धरला.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प आज अधिसभेत मांडला जाणार आहे. मात्र या सभेत प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीवरून गोंधळ उडाला. सभेतील प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीला कुलगुरूंचा विरोध तर सदस्यांचा यासाठी आग्रह होता. शेवटी सदस्य आणि कुलगुरूंच्या बैठकीनंतर अधिसभेत प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंजूर केलेला ३२० कोटी ७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज अधिसभेत मांडला जाणार आहे. यासाठी सकाळीच कुलगुरू, अधिसभा सदस्य विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये दाखल झाले होते. यावेळी सभेचे वार्तांकन करण्यास प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीसुद्धा तेथे उपस्थित होते. मात्र, माध्यम प्रतिनिधींच्या सभेत उपस्थित राहण्यावर कुलगुरूंनी विरोध केला. यावर सदस्यांनी त्यांच्या उपस्थितीसाठी आग्रह धरला. यातून सभेत प्रचंड गोंधळ उडाला. शेवटी कुलगुरू व अधिसभा सदस्यांची बैठक झाली व त्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सभेत उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली.

कसा आहे विद्यापीठाचा अर्थसंकल्प विद्यापीठाच्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीची माहिती विद्यापीठ अधिसभेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाली आहे. उत्पन्न आणि खर्चाचा मेळ कुठेही बसलेला नाही. यामुळे अर्थसंकल्पातील तुटीची मर्यादा तब्बल १७.३३ टक्क्यांवर पोहोचली आहे. यात विद्यापीठाला एकूण वेतनेतर उत्पन्न २०० कोटी ८८ लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

मात्र, याचवेळी वेतनेतर खर्चाची आवश्यकता तब्बल २५६ कोटी ३५ लाख रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे हा संकल्प तब्बल ५५ कोटी ४७ लाख रुपये एवढा तुटीचा असेल. विद्यापीठ प्रशासनाला एकूण खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ घालताना दमछाक झाल्याचे या संकल्पावरून दिसते. यात विद्यार्थ्यांच्या पायाभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अल्प तरतूद केली आहे. मात्र याच वेळी मेमोरियल, पुतळे उभारणी, सुशोभीकरण, बांधकाम आदी बाबींवर कोट्यवधींची तरतूद केली आहे. विद्यार्थी केंद्रित शिक्षण देत असल्याचे सांगण्यात येत असले तरी विद्यार्थी सुविधांसाठी अर्थसंकल्पात काहीच तरतूद करायची नाही, हा कित्ता यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गिरविणार आहे असेच चित्र आहे. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादBudgetअर्थसंकल्प 2023universityविद्यापीठStudentविद्यार्थीMediaमाध्यमे