शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मराठवाड्याच्या राजधानीसाठी ५०० कोटींचा विकास निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 18:49 IST

सर्व स्तरातून मागणी झाल्यानंतर शासनाचा निर्णय

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला वित्त विभागाने ५०० कोटींचा निधी देण्याची तरतूद केली आहे, अशी माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी कळविली आहे.

राजधानीचे ठिकाण म्हणून जिल्ह्याला ५०० कोटींची तरतूद अर्थमंत्र्यांकडे करण्यात आली होती. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादसाठी किमान ५०० कोटींचा निधी मिळावा. यासाठी वित्त व नियोजन विभागाकडे मागणी करणार असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ३ जानेवारी रोजी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. मात्र, त्यांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २१ जानेवारीच्या नियाेजन विभागाच्या बैठकीत ‘खो’ दिला होता. 

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेत ३२५ कोटींच्या मर्यादेत पालकमंत्री देसाई यांच्या निर्देशानुसार जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने ५०० कोटी रुपयांच्या १८४ कोटींच्या वाढीव मागणीसह प्रारूप आराखडा सादर केला होता. परंतु कोविड, महसुलात घट इत्यादीमुळे जिल्ह्याला ७० कोटी रुपये अधिक देत ३८५ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिली होती.

...यासाठी हवा होता वाढीव निधीऔरंगाबाद मराठवाड्याच्या राजधानीचे शहर आहे. या ठिकाणी मराठवाड्यासह लागून असलेल्या इतर विभागांच्या जिल्ह्यांतील रुग्णही घाटीत उपचारासाठी दाखल होतात. कोरोनासारख्या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याशिवाय इतर विकासकामे करणे निधीअभावी शक्य होत नाही. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बंधारे वाहून गेले आहेत. त्यांची दुरुस्ती करणे आहे. तसेच रस्त्यांचेही नुकसान झाले आहे. शहरी लोकसंख्या, पर्यटन सुविधा, अत्याधुनिक पोलीस वाहने, शाळा दुरुस्ती इ. बाबींच्या विकासासाठी निधी आवश्यक असल्याने वाढीव १८४ कोटी निधी मंजूर करावा, अशी मागणी अर्थमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे निधी वाढवून मिळाल्याचे पालकमंत्री देसाई यांनी कळविले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका