शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

चार बछड्यांच्या जन्माने सिद्धार्थ उद्यानाच्या समृद्धीत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 18:36 IST

दोन बछडे पांढरे तर दोन पिवळ्या रंगाची आहेत.

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात चार नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. शुक्रवारी रात्री ८ ते १२ वाजेदरम्यान वाघीण समृद्धी हिने चार बछड्यांना जन्म दिला. यात दोन बछडे पांढरे तर दोन पिवळ्या रंगाची आहेत. वाघीण आणि चारही बछड्यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांची आवश्यक ती काळजी घेत असल्याची माहिती महानगरपालिका सूत्रांनी दिली आहे. 

सिद्धार्थ आणि समृद्धी या वाघांच्या जोडीपासून ही पिल्लं जन्मली आहेत. महानगरपालीकेच्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात १९९१ पासून आजपर्यंत वाघांच्या सहा जोड्यांनी तब्बल २६ बछड्यांना जन्म दिला. त्यातील १२ बछडे देशभरातील विविध प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात आले. जागेअभावी प्राणिसंग्रहालयात आज ८ वाघ आहेत. त्यात आता आणखी चार बछड्यांची भर पडली आहे.

प्राणिसंग्रहालयात सध्या आहेत ८ वाघ २००५ मध्ये महापालिकेने पंजाब येथून चार पिवळे वाघ आणले. त्यांची नावे छोटू, गुड्डू, दीप्ती, कमलेश अशी आहेत. त्यांच्यापासून तब्बल ११ बछडे जन्माला आले. ५ बछडे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या सूचनेनुसार देशभरातील इतर प्राणिसंग्रहालयात वर्ग करण्यात आले. तीन बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या प्राणिसंग्रहालयात ७ पिवळे वाघ आहेत. त्यात सिद्धार्थ, समृद्धी, अर्जुन, करिना, करिश्मा, शक्ती, भक्ती यांचा समावेश आहे. तर प्रमोद आणि भानुप्रिया यांच्या अपत्यापैकी एकमेव ‘वीर’ हा पांढरा वाघ येथे आहे. 

फक्त केअर टेकरला परवानगी प्राणिसंग्रहालयात यापूर्वी तब्बल ८ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे प्राणिसंग्रहालयाच्या वतीने समृद्धी आणि तिच्या बछड्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. समृद्धीसह बछड्यांना संसर्ग होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. तसेच त्यांच्या जवळ केवळ केअर टेकरला जाण्यास परवानगी देण्यात आली असल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाकडून देण्यात आली आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादleopardबिबट्याAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका