शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय जागेवर होर्डिंग लावल्याप्रकरणी प्रिंटींग प्रेस चालकाविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 19:38 IST

पैठण शहरातील बसस्थानक चौक ते संत ज्ञानेश्वर उद्यान रोडवर लावले होते होर्डिंग

पैठण (औरंगाबाद ) : लोकसभेची आचारसंहिता लागू झालेली असताना राजकीय नेत्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे डिजिटल फ्लेक्स व होर्डिंग शासकीय जागेवर लावल्या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात फ्लेक्स ची छपाई करणाऱ्या दुकानदारा विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू असतांना पैठण येथील नगर परिषदेच्या शासकीय जागेवर भाजपा चे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावल्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग केला म्हणून पैठण पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पैठण शहरातील बसस्थानक चौक ते संत ज्ञानेश्वर उद्यान रोडवर  नगरपरिषदेच्या रस्त्यावरील विद्युत खांबावर खा. रावसाहेब दानवे यांच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देणारा डिजिटल बोर्ड लावण्यात आलेले होते. नपचे मुख्याधिकारी तथा  आचारसंहिता कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव यांना या बाबत माहिती मिळताच त्यांनी पथकासह पाहणी केली असता रस्त्यावरील खांबावर ११ डिजिटल फ्लेक्स लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. पथकातील अश्विन गोजरे, अशोक पगारे व पाटीलबा घुले व कर्मचाऱ्यांनी हे फ्लेक्स काढुन जप्त केले. 

याबाबत न प चे लिपिक अश्विन गोजरे यांनी पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित योगेश टेकाळे याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक