शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांची किरीट सोमय्यांविरोधात पोलिसात तक्रार; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 13:12 IST

गुन्हा दाखल झाल्याशिवाय पोलीस ठाणे सोडणार नसल्याची शिवसैनिकांची भूमिका

औरंगाबाद: आयएनएस विक्रांत मदत निधीमधून भाजपच्या ( BJP ) किरीट सोमय्यांनी (Kirit Somayya ) ५८ कोटी रुपये जमा केले असून ही रक्कम कुठेही जमा केली नाही, त्याचा हिशोबही देण्यात आला नाही. त्यावेळी सोमय्यांकडे ५ हजार रुपये जमा केलेला साक्षीदार आमच्याकडे आहे, याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये शिवसेना ( Shiv Sena ) नेते चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire )  यांनी दिली आहे. याप्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले असून गुन्हा दाखल झाल्याशिवाय ठाणे सोडणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

भाजपच्या किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांनी राज्यात विविध भागात आज सकाळी आंदोलन केले. औरंगाबादेतही क्रांती चौकात शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन करत विक्रांत बचाव निधीत अपहार प्रकरणी सोमय्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाध्यक्ष नरेंद्र द्विवेदी, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह शिवसैनिकांनी क्रांती चौक पोलीस ठाणे गाठले. 

येथे माजी खासदार आणि शिवसेना नेते खैरे यांनी, किरीट सोमय्या यांच्याकडे आयएनएस विक्रांतसाठी ५ हजार रुपये जमा केल्याचा साक्षीदार जिल्हाध्यक्ष नरेंद्र द्विवेदी आहेत. अशा प्रकारे सोमय्यांनी जवळपास ५८ कोटी रुपये जमा केले. ही रक्कम राजभवनात जमा केली नाही, याचा कसलाही हिशोब देण्यात आला नाही. या निधीत अपहार झाल्याचा आरोप करत याप्रकरणी सोमाय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार पोलीस ठाण्यात दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष नरेद्र द्विवेदी यांनी त्यावेळी सोमय्यांकडे ५ हजार रुपये मदत निधी दिल्याचा दावा केला. 

दरम्यान, खैरे यांनी गुन्हा दाखल केल्याशिवाय शिवसैनिक पोलीस ठाणे सोडणार नसल्याची भूमिका घेतली आहे. मागील अर्ध्या तासांपासून शिवसैनिक ठाण्यात ठिय्या देऊन आहेत. तर पोलिस आयुक्तांशी चर्चा करून पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक दराडे यांनी दिली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादKirit Somaiyaकिरीट सोमय्याChandrakant Khaireचंद्रकांत खैरेfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी