शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पैसे मागणाऱ्या अधिष्ठाताविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 19:03 IST

व्हायवा घेण्यासाठी पैसे मागितल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले.

ठळक मुद्देविद्यापीठातील संवैधानिक पदावरील सर्व नियुक्त्यांची चौकशी करण्याची मागणीसर्वपक्षीय विद्यार्थी संघटनाही आक्रमक

औरंगाबाद : पीएच.डी.चा व्हायवा घेण्यासाठी पैसे मागितल्याप्रकरणी अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या विरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने  बेगमपुरा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विद्यापीठाकडून तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. तक्रारीच्या अनुषंगाने तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी सांगितले. 

व्हायवा घेण्यासाठी पैसे मागितल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले.  डॉ. अमृतकर यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विद्यापीठ बचाव कृती समितीच्या शिष्ठमंडळाने मंगळवारी पुन्हा कुलगुरूंची भेट घेतली. विद्यापीठाची  बदनामी होत असल्यामुळे अधिष्ठातांवर  पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची आग्रही मागणी केली. कृती समितीची मागणी आणि विद्यार्थी संघटनांच्या आग्रहामुळे कुलगुरूंनी अधिष्ठातांविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचे आदेश दिल्याचे कृती समिती समन्वयक डॉ. राजेश करपे यांनी सांगितले.

विद्यापीठातील संवैधानिक पदावरील सर्व नियुक्त्यांची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार संबंधितांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी सेवानिवृत न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून येत्या १५ दिवसांत अहवाल सादर करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरूंनी दिल्याचे डॉ. शंकर अंभोरे यांनी सांगितले. डॉ. फुलचंद सलामपुरे,  डॉ. विलास खंदारे, सुनील मगरे, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. संभाजी वाघमारे, डॉ. गोपाल बच्छिरे, डॉ. भास्कर टेकाळे, दादासाहेब गजहंस, प्रा. बंडू सोमवंशी, डॉ. एस. बी. वाघमारे,         डॉ. अनिल पांडे, दीपक साळुंके, शिवराम म्हस्के, डॉ. गंगाधर मोरे, रमाकांत छडीदार आदी यावेळी उपस्थित होते.

सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनाही आक्रमकसामाजिक शास्त्राच्या अधिष्ठातांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, बडतर्फीची कारवाई करून संबंधित विद्यार्थ्यांचा व्हायवा तात्काळ घेण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या. यावर कुलगुरूंनी येत्या १५ दिवसांत त्या विद्यार्थ्यांचा व्हायवा घेण्याचे आश्वासन विद्यार्थी संघटनांना दिले.  सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनेने पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन सादर केले. यावेळी अधिसभा सदस्य अ‍ॅड. विजय सुबुकडे, एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कुणाल खरात, प्रशांत वाघमारे, युवक काँग्रेसचे प्रवक्ते नीलेश आंबेवाडीकर, वंचित बहुजन शिक्षक आघाडीचे डॉ. किशोर वाघ, रिपब्लिकन सेनेचे सचिन निकम, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीचे गुणरत्न सोनवणे, अ‍ॅड. अतुल कांबळे, मझर पठाण, अब्दुल रहेमान आलम खान, मोहमीन खान आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादProfessorप्राध्यापकStudentविद्यार्थीMONEYपैसा