शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

लढवय्या विद्यार्थी कार्यकर्त्याची मृत्यूशी झुंज अपयशी, भावांसह बहिणीने दिला अग्निडाग

By विजय सरवदे | Updated: September 22, 2023 12:38 IST

या संपूर्ण आजारपणात सावलीसारखी सोबत असलेली बहीण श्रद्धा हिने यावेळी अत्यंत धीराने आपल्या भावांसोबत अमोलच्या पार्थिवाला अग्निडाग दिला.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लढवय्या विद्यार्थी कार्यकर्ता अमोल खरात (वय ३४) याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपशयी ठरली. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा माजी राज्याध्यक्ष अमोल खरात हा मागील काही दिवसांपासून मेंदूच्या ‘न्युरो ऑटोइम्यून’ या दुर्मीळ आजाराने त्रस्त होता. उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.

त्याच्या पश्चात वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्याच्या या संपूर्ण आजारपणात सावलीसारखी सोबत असलेली बहीण श्रद्धा हिने यावेळी अत्यंत धीराने आपल्या भावांसोबत अमोलच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. मूळगाव केहाळा (ता. जिंतूर, जि. परभणी) येथे नातेवाईक, विद्यार्थी, चळवळीतील कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत गुरुवारी दुपारी दोन वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अमोल हा विद्यापीठाच्या इतिहास विभागातील संशोधक विद्यार्थी होता. त्याला नुकतीच फेलोशिपही मिळाली होती. सहा महिन्यांपूर्वी अमोल खरात याच्या नेतृत्वाखालीच बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन झाले. तब्बल पन्नास दिवस चाललेल्या या आंदोलनानंतर राज्य सरकारने सर्व आठशे संशोधक विद्यार्थ्यांना बार्टीची फेलोशिप लागू केली. विद्यापीठाशी संबंधित आंदोलनांमध्ये तसेच परिवर्तनवादी चळवळीत तो कायम अग्रेसर असायचा. अमोलच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे समजल्यावर ‘लोकमत’ने त्याच्या मदतीसाठी आवाहन केले होते. त्यानुसार अनेकांनी त्याला आर्थिक मदतही केली होती.

मदतीसाठी अनेकांचे हात सरसावले पण...शैक्षणिक तथा सामाजिक क्षेत्रात अमोल कायम अग्रभागी राहून आंदोलनात सक्रीय होता. मेंदूवरील दुर्मिळ आजारावर उपचारासाठी लागणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील ३० इंजेक्शनसाठी मोठा खर्च येणार होता. त्याच्या या आजारपणाची माहिती ‘लोकमत’च्या डिजिटल आणि प्रिंटच्या अंकातून मिळताच अनेकांनी मदतीचे आवाहन केले. अनेकांनी मदतीसाठी धाव घेतल्याने तत्काळ उपचार सुरू झाले. तो उपचारास प्रतिसाद देत असल्याने सर्वांना हायसे वाटले. बुधवारी दुपारी देखील त्याची प्रकृती समाधानकारक होती. मात्र रात्री साडेअकरा वाजता त्याची प्रकृती अचानक बिघडली. डॉक्टरांनी अमोलला आयसीयू मध्ये दाखल केले. येथेच गुरुवारी पहाटे दोन वाजता या लढवायची आजारासोबत सुरू असलेली झुंज संपली. 

राज्यभरातून चळवळीतील कार्यकर्ते केहाळाकडेउपचार सुरु असताना लढवय्या अमोलचे अचानक निधन झाल्याचे समजताच अनेकांना धक्का बसला. वार्ता समजताच गुरुवारी पहाटे घाटी रुग्णालयात कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. त्यानंतर जसे जमेल तसे विद्यार्थी, प्राध्यापक, चळवळीतील कार्यकर्त्यांनी अंत्यसंस्काराठी केहाळा गाव गाठले. दुपारी दोन वाजे दरम्यान त्याच्यावर रिमझिम पावसात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेकांना आपल्या भावना अनावर झाल्या. राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी अमोल खरात अमर रहे , जय भीम, लाल सलामचा जयघोष करत त्याला अखेरची सलामी दिली. दरम्यान, अत्यंत कमी वयात केलेल्या अमोलच्या कार्याची, आंदोलनातील सहभागाची आठवण सांगणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण