शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

महामॅरेथॉन ऑनलाइन नोंदणीसाठी मोजके काही दिवसच शिल्लक

By जयंत कुलकर्णी | Updated: December 9, 2023 20:07 IST

छत्रपती संभाजीनगरात दि. १७ डिसेंबरला विभागीय क्रीडा संकुलवर लोकमत महामॅरेथॉनचा थरार रंगणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरात दि. १७ डिसेंबरला विभागीय क्रीडा संकुलवर लोकमत महामॅरेथॉनचा थरार रंगणार आहे. या महामॅरेथॉनला उदंड प्रतिसाद मिळत आहे. महामॅरेथॉनच्या ऑनलाइन नोंदणीसाठी मोजकेच दिवस शिल्क आहेत. त्यामुळे ज्यांनी आपला सहभाग अद्याप निश्चित केला नाही अशांनी आता लवकरात लवकर नोंदणी करणे आवश्यक आहे.

विभागीय क्रीडा संकुलावर दि. १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या लोकमत महामॅरेथॉनसाठी छत्रपती संभाजीनगरच नव्हे, तर मराठवाडा व राज्यभरातील धावपटू, नागरिक, युवा आणि युवतींसह नागरिकांनी वैयक्तिक आणि कुटुंबांसह महामॅरेथॉनमध्ये धावण्याचा निर्धार करीत मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी केली आहे.

लोकमत महामॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त नागरिक, खेळाडू, महिला, युवक आणि युवतींनी जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग लवकरात लवकर निश्चित करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

महामॅरेथॉनमध्ये ज्यांना धावण्याची सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी ३ व ५ कि.मी. हे अंतर असणार आहे. तसेच, १२ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी ५ कि.मी. अंतराच्या फन रनचा यात समावेश आहे. १६ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे १० कि.मी. पॉवर रनमध्ये सहभागी होऊ शकतात, तर नियमित सराव असणाऱ्या प्रोफेशनल धावपटूंसाठी २१ कि.मी. अंतर असणार आहे.

१२ लाखांपर्यंत बक्षिसेमॅरेथॉनमध्ये २१ आणि १० कि.मी.मध्ये सहभागी झाल्यानंतर १२ लाखांपर्यंत असणार पारितोषिके. तसेच ३ आणि ५ कि.मी.मधील स्पर्धकांना मिळणार मेडल आणि प्रमाणपत्रे. यंदा होणारी महामॅरेथॉन ३ कि.मी., ५ कि.मी., १० कि.मी. आणि २१ कि.मी. अंतरात होणार आहे.

दि. १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनसाठी धावपटू, नागरिक गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध मैदानांवर कसून सराव करीत आहेत.

ऑनलाइन नोंदणीसाठीhttp://tiny.cc/LokmatAurangabad या लिंकवर किंवा क्यूआर कोड स्कॅन करून सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना वैयक्तिक आणि ग्रुप रजिस्ट्रेशनही करता येणार आहे. अधिक माहितीसाठी ९४२३९३१८७३, ८०५५५६२१२१, ७३८७३३३८७८, ८९९९६११९५४ या क्रमांकांवर संपर्क साधा.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनAurangabadऔरंगाबाद