शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

बाप-लेकाची भेट अधुरी राहिली; आकाशवाणी चौकात भरधाव कारने ७५ वृद्धास उडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 14:08 IST

७५ वर्षीय वृद्ध कन्नड तालुक्यातील गावातून मुलांना भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आले होते

छत्रपती संभाजीनगर: कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथून छत्रपती संभाजीनगरात राहणाऱ्या मुलांना भेटण्यासाठी आलेल्या एका वृद्धास आकशवाणी चौकात भरधाव कारने बुधवारी दुपारी उडवले. रात्री १२ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू झाला. दीपा राठोड ( ७५ )असे मृताचे नाव आहे. 

भांबरवाडी येथील दीपा राठोड यांची दोन मुले काशिनाथ आणि शंकर छत्रपती संभाजीनगर येथे राहतात. भानुदास नगर येथे राहणाऱ्या काशिनाथ याला भेटण्यासाठी बुधवारी सकाळी कन्नड येथून राठोड निघाले. दुपारी छत्रपती संभाजीनगर येथे पोहचल्यानंतर अडीज वाजेच्या सुमारास ते रिक्षाने आकाशवाणी चौकात आले. येथून भानुदास नगरकडे जात असताना एका भरधाव कारने राठोड यांना उडवले. जोरदार धडकेने गंभीर जखमी झालेल्या राठोड यांना नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच काशिनाथ आणि शंकर या दोन्ही मुलांनी रुग्णालयात धाव घेतली. रात्री १२ वाजेच्या सुमारास राठोड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वृद्ध दीपा राठोड मुलांना भेटण्यासाठी शहरात आले होते. अपघातात प्राण गमवल्याने बाप-लेकाची भेट अधुरी राहिली. दरम्यान, आकाशवाणी चौकात वाहतुकी कोंडी आणि पादचारी सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मागील काही दिवसांपासून या चौक बंद करून वाहतूक सकाळी ९ ते रात्री ९ एकेरी करण्यात आली आहे. या परिसरातील नागरिकांचा यास विरोध आहे. तर येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारक त्रस्त आहेत.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद