शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा व सुनेने केलेल्या मारहाणीत बापाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 09:46 IST

डोंगरू तांडा येथील राजू भुरा चव्हाण यांचे मुलगा मांगीलाल व सून कोमल यांच्यासोबत मालमत्तेच्या वाटणीवरून वाद होते. मंगळवारी त्यांच्यात जोराचे भांडण झाले

ठळक मुद्देपोलिसांनी आरोपी मुलगा मांगीलाल व त्याची पत्नी कोमल यांना अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्क    पैठण (जि. औरंगाबाद) : घरगुती मालमत्तेच्या वाटणीवरून मुलगा व सुनेने कुऱ्हाडीच्या दांड्याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बापाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना पैठण तालुक्यातील बिडकीनपासून जवळ असलेल्या डोंगरू नाईक तांड्यावर मंगळवारी घडली. राजू भुरा चव्हाण असे मयताचे नाव आहे.  

डोंगरू तांडा येथील राजू भुरा चव्हाण यांचे मुलगा मांगीलाल व सून कोमल यांच्यासोबत मालमत्तेच्या वाटणीवरून वाद होते. मंगळवारी त्यांच्यात जोराचे भांडण झाले. यात मुलगा मांगीलाल व त्याच्या पत्नीने राजू चव्हाण यांना कुऱ्हाडीच्या दांड्याने जबर मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या राजू चव्हाण यांना तत्काळ बिडकीन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी आरोपी मुलगा मांगीलाल व त्याची पत्नी कोमल यांना अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस