शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सासऱ्याला हृदयविकाराचा झटका; जावयाने ५ तास कार रुग्णालयाबाहेरच थांबविल्याने मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:42 IST

रुग्णालयात नेलेच नसल्याचे महिन्याभरानंतर उघडकीस : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, जावयाला अटक

छत्रपती संभाजीनगर : कौटुंबिक वादात जावयाने सासऱ्याला जोरात ढकलून दिले. यात हृदयावर ताण आल्याने सासऱ्याची प्रकृती खालावली. बेशुद्ध पडल्याने जावयानेच त्यांना एमजीएम रुग्णालयात घेऊन जाण्याचे नाटक केले. मात्र, रुग्णालयात न नेता बाहेरच ५ ते ६ तास तसेच कारमध्ये ठेवून मृत्यू झाल्यानंतर मृतदेहच घरी नेला. वडिलांच्या मृत्यूच्या कारणाचा तपास करताना मुलीला नवऱ्याचा हा विकृतपणा कळाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून अखिलेश यादगिरी मुदिराज (३८, रा. नंदनवन कॉलनी) याला अटक केली.

सुनीलकुमार चोप्रा (६८, रा. गुलमोहर कॉलनी, एन-५) असे मृत ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. त्यांच्या दोन्ही मुली विवाहित असून, मोठी मुलगी स्वाती हिचा अखिलेशसोबत विवाह झाला. मात्र, त्यांच्यात सतत कौटुंबिक कलह होत. १ मे राेजी अखिलेश रात्री ९:३० वाजता सासरी गेला. तेथे त्याने स्वातीसोबत भांडण सुरू केले. सुनीलकुमार व त्यांची पत्नी डॉली यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखिलेशने त्यांना जोरात धक्का देत दूर ढकलले. सुनील कोसळल्याने डाॅली यांनी त्यांना आतील खोलीत नेले. तरीही अखिलेश आरडाओरडा करीतच होता. यात हृदयावर दबाव येऊन सुनीलकुमार बेशुद्ध पडले. रात्री ११ वाजता अखिलेश चालकासोबत त्यांना रुग्णालयात घेऊन गेला.

पत्नीला म्हणाला, वडिलांवर आत उपचार सुरूअखिलेशवर विश्वास नसल्याने आईच्या सांगण्यावरून स्वाती एमजीएम रुग्णालयात पोहोचल्या. तेथे अखिलेशने कॅज्युअल्टी विभागात तपासणी सुरू आहे. मी येथे थांबतो. तू मुलांना घेऊन घरी जा, असे सांगितले. मात्र, पहाटे ४ वाजता अखिलेश थेट मृतदेहच घरी घेऊन गेला. अखिलेशने त्यांच्या शवविच्छेदनावरूनदेखील मोठा वाद घातला. त्यामुळे २ मे रोजी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

कारमध्ये मृत्यू होऊ दिला, जावयावर आरोपवडिलांच्या मृत्यूबाबत सतत मनात शंका येत असल्याने डॉक्टर असलेल्या स्वाती यांनी तपास करण्याचे ठरवले. त्यांनी ४ जून रोजी एमजीएम रुग्णालयाकडे वडिलांच्या उपचाराबाबत अर्जाद्वारे कागदपत्रे मागवली. मात्र, रुग्णालय प्रशासनाने सुनीलकुमार नावाच्या कुठल्याच रुग्णाला १ मे रोजी दाखल केले नाही तसेच कुठलेही उपचार केले गेले नाहीत, असा अहवाल दिला. तेव्हा अखिलेशचा बनाव समजला. या प्रकाराला अखिलेशच जबाबदार असल्याचा आरोप डॉली यांनी तक्रारीत केला. त्यावरून अखिलेशवर बीएनएस १०५ अंतर्गत (सदोष मनुष्यवध) गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले. अखिलेश हा व्यावसायिक सल्लागार आहे. त्याला न्यायालयाने ३ दिवस पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीHeart Attackहृदयविकाराचा झटका