शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाच्या बैठकीहून परताना 'समृद्धी'वर भीषण अपघात; 'बसपा' जिल्हाध्यक्षासह दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 12:27 IST

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बसपाची समीक्षा बैठक मुंबईतील कार्यालयात मंगळवारी आयोजित केली होती.

छत्रपती संभाजीनगर / सिन्नर (नाशिक) : विधानसभा निवडणुकीनंतर बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) मुंबईत आयोजित समीक्षा बैठकीनंतर छत्रपती संभाजीनगरकडे परतणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. त्यात दोघांचा मृत्यू झाला, तर चौघे जण जखमी झाले. ही घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील गोंदे इंटरचेंजजवळ समृद्धी महामार्गावर बुधवारी पहाटे चारच्या सुमारास घडली.

सचिन सुभाष बनसोडे (रा. इंदिरानगर, गारखेडा परिसर) आणि प्रशांत सुनील निकाळजे (रा. संजयनगर, मुकुंदवाडी) अशी अपघातात मृत्यू झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बसपाची समीक्षा बैठक मुंबईतील कार्यालयात मंगळवारी आयोजित केली होती. या बैठकीला छत्रपती संभाजीनगरचे बसपा जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे यांच्यासह इतर चार वाहने गेली होती. सायंकाळी बैठक संपल्यानंतर बसपा पदाधिकारी समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरच्या येत होते. त्यात मारुती सुझुकी कंपनीची एक्सएल सिक्स कार (एमएच २० जीक्यू ८५१५) कंटेनर (एचआर ३८ एसी ३०९५) वर मागून धडकली. अपघात एवढा भीषण होता की, कारचा समोरील भाग चक्काचूर झाला. सचिन बनसोडे यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील प्रशांत निकाळजे शुभम दसारे (२५, रा. पुंडलिकनगर), सचिन मनोहर साळवे (२५, रा. बंबाटनगर), शुभम दांडगे (२६, रा. जवाहर कॉलनी) आणि अनिल मनोहर (२९) हे गंभीर जखमी झाले. या सर्वांना सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना प्रशांत निकाळजे यांचा मृत्यू झाला. उर्वरित चार जणांना नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

सिंदखेडराजा येथे पकडला कंटेनरअपघाताची घटना घडल्यानंतर घटनास्थळावर पोलिसांना कंटेनरची नंबर प्लेट आढळून आली. त्याआधारे समृद्धी महामार्गावरील सर्व टोल प्लाझांना त्याची माहिती देण्यात आली. वावीचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अजय महाजन, किरण पवार, नवनाथ आडके कंटेनरच्या शोधासाठी खासगी वाहनातून जालन्याच्या दिशेने रवाना झाले. सदरचा कंटेनर सिंदखेडराजा येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आला. यावेळी समृद्धी महामार्गाच्या कडेला चालक स्वयंपाक करताना सापडला.

प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कारबहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे व त्यांचा मेहुणा प्रशांत निकाळजे यांच्यावर बुधवारी दुपारी प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत गादिया विहार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिन बनसोडे हे गादिया विहार भागातच राहत होते; तर प्रशांत निकाळजे हे मुकुंदवाडीत राहत होते. सचिनच्या पश्चात वडील, एक भाऊ, पत्नी शीतल बनसोडे, मुलगी असा परिवार आहे. शीतल बनसोडे यांनी औरंगाबाद पूर्वमधून विधानसभा लढवली होती. शीतल बनसोडे यांचे प्रशांत निकाळजे हे सख्खे भाऊ होत. प्रशांत निकाळजे हेही बसपामध्येच कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

आंबेडकरी चळवळीचे नुकसानसचिन व प्रशांतच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे हेही मुंबईहून आले होते. स्मशानभूमीत माजी उपमहापौर प्रकाश निकाळजे, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, बंडू कांबळे व श्रावण गायकवाड यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. आंबेडकरी चळवळीचा निष्ठावान कार्यकर्ता अशी सचिन बनसोडे यांची ओळख होती. चळवळीचे कोणतेही आंदोलन असो; पक्षाचा प्रोटोकॉल बाजूला सारून सचिन त्यात सहभागी होत असत. पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने त्यांना मोठमोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडता आल्या. प्रदेश पातळीवरही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. गेली अनेक वर्षे ते बसपाचे जिल्हाध्यक्ष होते. प्रशांत निकाळजे आंंबेडकरी चळवळीत सदैव सक्रिय असत.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघात